इस्रायलला नोकरीसाठी हरियाणातील ५३० तरुणांचा समूह रवाना!

प्रति महिना १.३७ लाख रुपये मिळणार पगार

इस्रायलला नोकरीसाठी हरियाणातील ५३० तरुणांचा समूह रवाना!

हरियाणातून ५३० तरुणांचा समूह इस्रायलमध्ये नोकरीसाठी निघाला आहे. हरियाणा कौशल्य विकास महामंडळाने या तरुणांची निवड केली आहे.या सर्व तरुणांच्या मुलाखती हरियाणातील रोहतक येथे घेण्यात आल्या होत्या.निवड करण्यात आलेले सर्व तरुण आज मंगळवारी (३ एप्रिल) इस्रायलला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ५३० तरुण नवी दिल्लीहून इस्रायलला रवाना झाले आहेत. इस्रायलला जाण्यापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी या तरुणांशी चर्चा केली.या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारतीय बांधकाम कामगारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया हरियाणाच्या रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठात सुरू करण्यात आली होती.ही भरती प्रक्रिया सहा दिवस चालली आणि या भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला होता. या कालावधीत ८१९९ तरुणांनी अर्ज केले होते.

इस्रायलरवाना होण्यापूर्वी तरुणांनी हरियाणा सरकारचे आभार मानले. मुख्यमंत्री नायब सिंग यांनीही तरुणांचे अभिनंदन केले. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनीही तरुणांशी संवाद साधत तरुणांनी राज्य आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी काम करावे, असे सांगितले.

हे ही वाचा:

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

तिबेट क्षेत्राला ६० भौगोलिक नावे जाहीर करा

सुशील कुमार मोदी कॅन्सरने ग्रस्त!

दरम्यान, इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे.इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींचे वर्क परवाने रद्द करण्यात आले.पॅलेस्टिनींचे वर्क परवाने रद्द केल्यामुळे इस्रायलला तीव्र कामगार टंचाईचा सामना करावा लागत आहे.या कारणामुळे इस्रायलने भारताकडे कामगार पाठवण्याची विनंती केली. इस्रायलकडून १०,००० बांधकाम कामगारांची मागणी होती. यामध्ये फ्रेमवर्क, शटरिंग, सुतार, प्लास्टरिंग, सिरॅमिक टाइल, यार्न बेडिंगसाठी आवश्यक मजुरांचा समावेश आहे.

दरम्यान नोकरीसाठी निवड करण्यात आलेला हरियाणातील ५३० तरुणांचा समूह आज इस्रायलला रवाना झाला आहे.आता या कामगारांना १,३७,००० रुपये प्रति महिना पगार मिळणार आहे.याशिवाय वैद्यकीय विमा, भोजन आणि निवासाची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याला १६,५१५ रुपयांचा बोनस देखील मिळणार आहे.तरुणांच्या निवडीसाठी काही निकष ठेवण्यात आले होते.यामध्ये पात्रता निकष १० वी पास, तीन वर्षांचा अनुभव, वय २५ ते ४५ वर्षे निश्चित करण्यात आले होते.

Exit mobile version