25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषइस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!

इस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!

इस्रायल सुरक्षा दल प्रवक्त्याने दिली माहिती

Google News Follow

Related

इस्रायलच्या सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतून एक ब्रिगेड वगळता सर्व सैन्य मागे घेतल्याचे इस्रायलच्या सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. तथापि, लष्कराने सहभागी सैनिकांच्या संख्येसह अधिक तपशील दिलेला नाही. त्यांनी युद्धाच्या सक्रिय आक्रमणाचा टप्पा आता पूर्ण केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र ही घोषणा म्हणजे दक्षिण गाझामधील रफाह शहरात भविष्यात नवीन आक्रमण करण्याचे संकेत असल्याचेही बोलले जात आहे.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवर आधारावरील छाप्यांवरच जोर दिला जाईल, हाच हमास दहशतवाद्यांविरूद्ध प्रभावी मोहीम राबवण्याचा मार्ग असेल, असा विश्वास इस्रायलच्या लष्कराने व्यक्त केला आहे.जेरुसलेम पोस्टच्या म्हणण्यानुसार, इस्रायल लष्कराचे एका वेळी ३० ते ४० हजारांच्या सैन्याचे पाच विभाग गाझामध्ये तैनात होते. तर गाझा पट्टीच्या भोवती वेढा घालणारी फौज त्याहूनही मोठी होती. सैन्यात कपात केल्यानंतर इस्रायलच्या सुरक्षा दलाने दक्षिण गाझामधील खान युनिसमधून ९८ डिव्हिजनला मागे घेतले आहे आणि उत्तर आणि मध्य गाझामध्ये एक ब्रिगेड ठेवली आहे.

हे ही वाचा..

आत्महत्येपूर्वी सलग २९ तास अनन्वित छळ!

दक्षिणेतही भाजपला मिळणार ताकद; ममता यांना बसणार धक्का

लोकसभेपूर्वी कर्नाटक पोलिसांची धडक कारवाई; ७.६ कोटींची रोकड, सोने-चांदी जप्त

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगच्या आईला अटक

डिसेंबरपासून डिव्हिजन ९८ खान युनिस आणि आसपासच्या भागात हमासच्या दहशतवाद्यांना निष्प्रभ करत आहे.
खान युनिसमध्ये डिव्हिजन ९८ ठेवण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ओलिसांची सुटका करण्यासाठी वाटाघाटींमध्ये हमासकडून सवलत मिळवणे हे असल्याचे सांगितले जाते.

हमासच्या ७ ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून इस्त्रायलने जमिनीवर कारवाई सुरू झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी एक ब्रिगेड वगळता संपूर्ण सैन्याची माघार घेतली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे इस्रायलच्या संरक्षण दलाने उत्तर गाझावर नियंत्रण मिळवल्याचे जाहीर केल्यावर जानेवारीच्या मध्यापासून इस्रायली सैन्य गाझामधील सैन्याच्या संख्येत लक्षणीय घट करत आहे. मित्र देश अमेरिकेकडून सातत्याने गाझामधील मानवतावादी परिस्थिती सुधारण्यासाठी इस्रायलवर राजनैतिक दबाव आणला जात आहे. हा राजनैतिक दबाव कमी करणे, हा देखील या सैन्यमाघारीचा हेतू असल्याचे बोलले जात आहे.इस्रायलने मानवतावादी मदतीसाठी इरेझ क्रॉसिंग आणि अश्दोद बंदरही खुले केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा