इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

इस्रायलच्या बॉम्बवर्षावात ४५ पॅलिस्टिनींचा मृत्यू

इस्रायल-हमासदरम्यान भीषण युद्धाला सुरुवात!

राफाह आणि गाझामधील अन्य परिसरात इस्रायलने शुक्रवारी केलेल्या भीषण बॉम्बवर्षावात ४५ पॅलिस्टिनी नागरिक मारले गेले. अनेक ठिकाणी इस्रायली सैनिक आणि पॅलिस्टिनी दहशतवाद्यांमध्ये युद्ध सुरू असल्याचे इस्रायलतर्फे सांगण्यात येत आहे. इस्रायलचे लष्कर सुमारे दीड महिन्यांपासून राफाह शहरात लढत असून तिथे संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. राफाहमध्ये अन्य शहरांतून आलेल्या एक लाखाहून अधिक बेघर पॅलिस्टिनींनी आश्रय घेतला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला या आश्रितांची संख्या १४ लाख होती. मात्र इस्रायली हल्ल्यापासून वाचण्यासाठी सुमारे १३ लाख जणांनी गाझाच्या अन्य भागांत पलायन केले आहे.

गोळीबारात १२ आश्रितांचा मृत्यू
राफाहच्या रहिवाशानी सांगितल्यानुसार, इस्रायली तोफांकडून शहराच्या पश्चिम आणि उत्तर सीमेकडून गोळीबार सुरू आहे. तर, लढाऊ विमानांकडूनही बॉम्बवर्षाव होत आहे आणि समुद्रातही लढाऊ रॉकेट आणि क्षेपणास्त्र डागले जात आहे. शुक्रवारी राफाहच्या पश्चिम भागामध्ये केलेल्या गोळीबारात १२ पॅलिस्टिनींचा मृत्यू झाला. इस्रायलने केलेल्या माऱ्यातील एक तोफगोळा शरणार्थींच्या तंबूवर कोसळला. गेल्या दोन दिवसांत कारवाईला वेग आल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यानुसार, पॅलिस्टिनींचा विरोधही तीव्र झाला आहे. हमासने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैनिकांनी गुरुवारी दोन इस्रायली तोफांना लक्ष्य करून उद्ध्वस्त केले.

हे ही वाचा:

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा परकीय चलन साठा ७१.७४ पट मोठा

‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका

नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी हिंदुजा कुटुंबातील चार जणांना साडेचार वर्षांपर्यंतची शिक्षा

संपूर्ण शहर इस्रायली कारवाईच्या विळख्यात
राफाहचे महापौर अहमद अल-सोफी यांच्या सांगण्यानुसार, संपूर्ण शहर इस्रायल लष्कराच्या कारवाईच्या विळख्यात आहे. येथील सर्वसामान्यांची कोणतीच पर्वा इस्रायली लष्कराला नाही. त्यामुळे प्रतिदिन मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य माणसे मारली जात आहेत. जखमींच्या उपचारासाठी आता कोणतीही सुविधा शिल्लक नाही. गाझाच्या मध्यवर्ती भागातील नुसीरतमध्येही इस्रायल लष्कराच्या कारवाईतही मोठ्या संख्येने नागरिक मारले गेले. लष्करातील सूत्रांनी सांगितल्यनुसार, यातील बहुतांशी पॅलिस्टिनी दहशतवादी होते आणि येथे शस्त्रास्त्रांचे गोदाम असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यातच हे दहशतवादी मारले गेले.

Exit mobile version