कमला हॅरिस म्हणाल्या, ‘इस्रायल-गाझा’ युद्धावर गप्प बसणार नाही !

इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांशी घेतली भेट

कमला हॅरिस म्हणाल्या, ‘इस्रायल-गाझा’ युद्धावर गप्प बसणार नाही !

‘इस्रायल-हमास’ युद्धादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी (२५ जुलै) अमेरिकेत जाऊन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. यादरम्यान कमला हॅरिस यांनी युद्ध संपवण्यावर जोर दिला. कमला हॅरिस म्हणाल्या की, गाझाच्या दु:खाबद्दल मी गप्प बसणार नाही, यासाठी शपथ घेतली आहे. यावेळी दोन्ही अमेरिकन नेत्यांनी युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच आता युद्धविराम कराराची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, इस्त्रायललाही स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार असल्याचा पुनरुच्चार कमला हॅरिस यांनी केला.

गेल्या ९ महिन्यांपासून ‘इस्रायल-हमास’ यांच्यात युद्ध सुरु आहे. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने पहिलाही दबाव आणला होता. आताही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा तेथेही गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर चर्चा झाली. २०२० नंतर नेतन्याहू यांची चार वर्षानंतर ही पहिलीच भेट आहे.

हे ही वाचा:

गौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा !

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !

रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!

यावेळी कमला हॅरिस म्हणाल्या, इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. तो कसा करतो हे महत्त्वाचे आहे. मात्र, आपण गप्प बसणार नसल्याचे तिने निश्चितपणे सांगितले. मृत मुले आणि जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या लोकांच्या फोटोकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. मी गप्प बसणार नाही, असे कमला हॅरिस म्हणाल्या. दरम्यान, गाझामध्ये ९ महिन्यांपासून युद्ध सुरू असून युद्ध संपवण्यासाठी अनेक देश दबाव आणत आहेत, परंतु कोणताही तोडगा निघत नाहीये. या युद्धामुळे गाझामध्ये ३९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version