इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

युद्धाला पुन्हा सुरुवात

इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

युद्ध संपल्याची चर्चा असताना इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाझामधील अल नुसिरतमध्ये एका शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये शाळा पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसत आहे. तेथे उपस्थित असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही आपले निवेदन जारी केले आहे.

इस्त्रायलने असा युक्तिवाद केला आहे की त्यांनी दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे, परंतु हल्ला झालेल्या शाळेत महिला आणि मुले होती. पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीने या घटनेचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दिसत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही शाळा लोकांसाठी सुरक्षित मानली जात होती. इथे हल्ला व्हायला नको होता. आम्ही लहान मुलांचे मृतदेह पाहिले आहेत, जे याठिकाणी खेळत होते. मात्र, दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे इस्त्रायलचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने

‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’

महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!

‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’

दरम्यान, हमासने गाझा युद्ध संपवण्याच्या उद्देशाने केलेला अमेरिकेचा करार मान्य केला होता आणि इस्रायली ओलीस सोडण्यासाठी बोलणी सुरू केली होती. रॉयटर्सने आपल्या वृत्तात लिहिले होते की, हमासने अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला असून इस्त्रायली बंधकांच्या सुटकेसाठी चर्चा सुरू आहे, मात्र याचदरम्यान इस्रायलने हल्ला केला, त्यामुळे युद्धबंदी होईल की नाही याविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

Exit mobile version