इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

मुंबई हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने इस्रायल दूतावासाचा निर्णय

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीदिनानिमित्त इस्रायलने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले आहे.भारतातील इस्रायलच्या दूतावासाने माहिती दिली की, इस्रायलने सर्व आवश्यक प्रक्रिया औपचारिकपणे पूर्ण केल्या आहेत. बेकायदेशीर दहशतवादी संघटनांच्या इस्रायली यादीत लष्कर-ए-तैयबाचा समावेश करण्यासाठी सर्व तपास आणि नियम पूर्ण झाले आहेत.

मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी इस्रायलने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार इस्रायलने लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ला अधिकृतपणे दहशतवादी संघटना घोषित केले आहे.इस्रायली दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून, हा निर्णय भारत सरकारच्या कोणत्याही औपचारिक विनंतीशिवाय स्वतंत्रपणे घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

‘भारताचे फलंदाज चांगले खेळले नाहीत; खेळपट्टीला दोष देणार नाही’

पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या

भारतातील इस्रायलच्या दूतावासाने सांगितले की, ‘मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणार्थ १५ व्या वर्षाच्या निमित्ताने इस्रायल राज्याने लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले आहे. भारत सरकारने विनंती केली नसतानाही तसे करून, इस्रायल राज्याने सर्व आवश्यक प्रक्रिया औपचारिकपणे पूर्ण केल्या आहेत. प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या इस्रायली यादीत लष्कर-ए-तैयबाचा समावेश करण्यासाठी सर्व आवश्यक तपासण्या आणि नियम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version