27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषहमासने ५० ओलिसांना सोडल्यावरच इस्रायल चार दिवस हल्ले थांबवणार!

हमासने ५० ओलिसांना सोडल्यावरच इस्रायल चार दिवस हल्ले थांबवणार!

इस्रायल आणि हमास यांच्यात झाला करार

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धादरम्यान एक महत्वाचा करार झाला आहे.करारानुसार इस्रायली सैन्य गाझापट्टीमध्ये चार दिवस हल्ले थांबवणार आहे.मात्र, त्या बदल्यात अपहरण केलेल्या ५० नागरिकांची सुटका हमसला करावी लागणार आहे.हमासने देखील या कराराला सहमती दर्शविली आहे.हमासने या कराराचे स्वागत केले आहे आणि बंदी बनवण्यात आलेल्या नागरिकांच्या एका तुकडीला गुरुवार पर्यंत सोडले जाणार आहे.

इस्रायलच्या मंत्रिमंडळाने बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी या कराराला मंजुरी दिली.त्याबाबतची माहिती पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयाने दिली.दोन्ही देशात झालेल्या या कराराचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही.पंरतु, एका इस्रायली सरकारी अधिकाऱ्याने मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, या करारानुसार हमास दररोज १२-१३ लोकांची सुटका करू शकते, ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश असेल.

हेही वाचा..

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे मिळणार धडे!

मनसेचे पुन्हा खळखट्याक!

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सततच्या दबावानंतर इस्रायलने चार दिवसांसाठी युद्धविराम करण्यास सहमती दर्शवली आहे.दरम्यान, हमास पॉलिटब्युरोचे नेते इस्माईल हनीयेह यांनी मंगळवारी दावा केला होता की, आम्ही युद्धविराम कराराच्या जवळ पोहोचलो आहोत.मात्र, या कराराबाबत इतर कोणतीही माहिती त्याने दिलेली नाही.

दरम्यान, इस्रायलकडून सुरु करण्यात आलेल्या ‘स्वोडर्स ऑफ आयर्न’ या मोहिमेअंतर्गत गाझा पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई आणि जमिनीवर हल्ले करण्यात आले.या हल्ल्यात आतापर्यंत १४,१०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.मृतांमध्ये जास्तकरून महिला आणि मुलांचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा