संतापजनक! बांगलादेशात नमाजावेळी त्रास झाल्याने श्वानाला फासावर लटकवले!

'वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूस'ने दिली माहिती

संतापजनक! बांगलादेशात नमाजावेळी त्रास झाल्याने श्वानाला फासावर लटकवले!

बांगलादेशात हिंदुंवर होत असलेला अत्याचार शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून पुन्हा अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कट्टरवाद्यांविरोधात युनुस सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही. हिंदूंचे संरक्षण केले जाईल अशी आश्वासने सरकारकडून देण्यात येत आहे. याच दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कट्टरवादी आता प्राण्यांनाही सोडत नाहीयेत. नमाजाच्या वेळी त्रास होत असल्याने कट्टरवाद्यांनी श्वानाला ठार केले आहे. या घटनेमुळे सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे.

बांगलादेशातून काल एक घटना समोर आली होती. ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील नबीनगर पोलीस ठाणे भागातील एका हिंदू तरुणाला झाडावर लटकावून त्याची हत्या करण्यात आली होती. दीपल चक्रबर्ती असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई करत असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांकडून अशी कोणतीच कारवाई माहिती समोर आलेली नाही.

बांगलादेशात हिंदू समाजासह आता प्राणीही सुरक्षित नाहीत. कट्टरवाद्यांकडून एका श्वानाची हत्या करण्यात आली आहे. ‘वॉइस ऑफ बांगलादेशी हिंदूस’ने ट्वीटरवर याची माहिती दिली. तसेच फासावर लटकवलेल्या श्वानाचे फोटो शेअर केले आहेत. ट्वीटकरत लिहिले, इस्लामवाद्यांनी या श्वानाला काफिर असल्याचा दावा करत नमाजाच्या वेळी त्रास होत असल्याने ठार मारले. बांगलादेशात प्राणीही सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

मेलबर्न कसोटीमध्ये यशस्वीचा एकाकी लढा अपयशी; ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय

बांगलादेशात १०० हिंदू पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले!

दक्षिण कोरियाचे विमान कोसळण्याआधी काय घडले ?

पायांना स्पर्श केला तर काम करणार नाही; खासदाराच्या कार्यालयात अनोखा फलक

 

Exit mobile version