परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

देवी मां रक्षा काली मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी डायमंड हबूर दक्षिण २४ परगणा येथील सरिशाच्या कालागाचिया भागात भाजप कार्यकर्त्यांसह हिंदूंवर इस्लामवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. विसर्जनाच्या वेळी श्रीरामाची गाणी वाजवल्याबद्दल त्यांचे कार्यकर्ते आणि बूथ अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे भाजपने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. भाजपकडून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर राजकीय दहशतवादाचा आरोप केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिज्युअल्समध्ये घरांना आग लागल्याचे आणि प्रचंड धूर निघताना दिसत आहे. सिंघा वाहिनीचे अध्यक्ष भाजप नेते देवदत्त माळी यांनी घटनेचा तपशील शेअर केला आणि आरोप केला की १०० हून अधिक जिहादींना टीएमसी ब्लॉक अध्यक्ष एसके शमीम यांनी मोटारसायकलवरून पाठवले होते. हा पूर्वनियोजित हल्ला होता हे स्पष्ट आहे, असे एक्सवर पोस्ट केले आहे.

हेही वाचा..

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!

छत्तीसगढमध्ये बस दरीत कोसळली, १२ मजुरांचा मृत्यू!

बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपच्या आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेची उपमा २०१९ च्या डायमंड हार्बरच्या बिष्णुपूर ब्लॉक अंतर्गत बागखली गावात हिंदूंविरुद्धच्या हिंसाचाराशी दिली आहे. त्यानंतर स्थानिक मशिदींनी हल्ल्याचे आवाहन केले.
त्यांनी लिहिले की, ममता बॅनर्जींचा पुतण्या निवडणुकीत जिंकू शकतो हे निश्चित करण्यासाठी निवडणुकीच्या आधी हे प्रकार आता पुन्हा सुरू आहेत.गेल्या वर्षीप्रमाणेच १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनीही हिंसाचाराचा इशारा दिला आहे. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आणि त्यानंतर टीएमसीशी संलग्न अनेक दंगलखोरांना अटक करण्यात आली, असे मालवीय यांनी म्हटले आहे.

मात्र, पश्चिम बंगाल पोलिसांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर हल्ला झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. चुकीची भाषा वापरल्यामुळे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत ही घटना घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. डायमंड हार्बर पीएस अंतर्गत सरिशा परिसरात काल रात्री घडलेल्या घटनेबद्दल सोशल मीडियावर काही विशिष्ट वर्गांकडून जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवली जात आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की, चुकीची भाषा वापरल्यामुळे दोन गट एकमेकांशी भिडले, असे पोलिसांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली तत्पर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव कमी झाला. तिघांना अटक करण्यात आली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

जाणीवपूर्वक जातीय भावना पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या हल्ल्यात बळी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. माझी यांनी भाजपच्या १२ कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरचा तपशील शेअर केला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version