26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरविशेषडेन्मार्कने कुराण बाबत उचलले महत्वाचे पाऊल!

डेन्मार्कने कुराण बाबत उचलले महत्वाचे पाऊल!

कायद्याचे उल्लंघन केल्यास भोगावा लागणार दोन वर्षांचा तुरुंगवास!

Google News Follow

Related

डेन्मार्कने कुराण बाबत उचलले महत्वाचे पाऊल उचलले आहे.युरोपीय देश स्वीडनप्रमाणेच डेन्मार्कमध्येही कुराण जाळण्याच्या आणि अपमानाच्या अनेक घटना उघडकीस आल्याने मुस्लिम देशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.त्यांनतर डेन्मार्कने कुराण बाबत महत्वाचा कायदा निर्माण केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून युरोपीय देशांतून कुराण जाळण्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे मुस्लिम जगत प्रचंड संतापले असून त्यांनी स्वीडन, डेन्मार्क या देशांना अशा घटना थांबवण्याची विनंती केली आहे.आता डेन्मार्कने याबाबत मोठे पाऊल उचलले असून कायदा निर्माण केला आहे.इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्याच्या घटना पाहता युरोपियन देश डेन्मार्कने गुरुवारी संसदेत कुराण जाळण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे.कायद्यानुसार कुराणसह धार्मिक ग्रंथांसोबत अयोग्य वर्तन केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

कोणत्याही धार्मिक पुस्तकाचा अपमान करण्यावर बंदी घालणाऱ्या विधेयकाला डेन्मार्कच्या संसदेत १७९ सभासदांपैकी ९४ खासदारांनी पाठिंबा दिला तर ७७ खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले.

या संदर्भात न्याय मंत्री पीटर हॅमेलगार्ड म्हणाले की, “आम्ही डेन्मार्क आणि आमच्या लोकांचे संरक्षण केले पाहिजे.अशा प्रकारचे गैरवर्तन बऱ्याच काळा पासून चालू आहे आहे.त्यामुळे आपल्याला अशा गैरवर्तनांपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

झारखंड काँग्रेस खासदाराच्या घरात सापडले १०० कोटी रोख!

काश्मीरमध्ये परतली चित्रपटसंस्कृती

फिलिपिन्स, नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने

झिम्बाब्वे-आयर्लंड दरम्यान झाला रोमांचक सामना!

कायद्यानुसार, डेन्मार्कमध्ये कुराण किंवा कोणताही धार्मिक मजकूर फाडणे, जाळणे आणि सार्वजनिकरित्या त्याचा अपमान करणे किंवा किंवा त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे यावर बंदी असणार आहे.हा कायदा मोडणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, डेन्मार्कच्या शेजारील देश स्वीडनमधील एका इराकी निर्वासिताने ईद अल-अधाच्या दिवशी स्टॉकहोम सेंट्रल मशिदीसमोर कुराणाची प्रत पेटवून दिल्याची घटना घडली होती.त्यांनतर कुराण जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. यानंतर डेन्मार्कमधूनही कुराण जाळण्याचे व्हिडिओ येऊ लागले होते.कुराण जाळल्याने मुस्लिम देशांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा