द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (इस्कॉन) या संस्थेने कोविड काळात लोकांची मदत करण्याचे कार्य आरंभले आहे. या संस्थेने कोविड-१९ च्या काळात अनेकांना मोफत अन्न पुरवले आहे.
या संस्थेतील साधूंनी इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभूपाद यांची १९७५ मधील एका गोष्टीची आठवण सांगितली आहे. त्यावेळी प्रभूपाद यांनी दोन लहान मुलांना ब्रेडच्या तुकड्यावरून कुत्र्याशी लढताना पाहिले. त्यावेळी श्री प्रभूपाद यांनी ठरवले की इस्कॉन केंद्राच्या १० किमीच्या पट्ट्यातील कोणीही माणूस कधीही उपाशी राहणार नाही.
हे ही वाचा:
मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?
‘तेजस’च्या भात्यात आणखी एक क्षेपणास्त्र
पीएम केअर्समधून प्राणवायू संचांचा पुरवठा
आचार्य श्री प्रभूपाद यांच्या याच विचारसरणीला तेथील साधू पुढे घेऊन जात आहेत. गुरुग्राम मधील इस्कॉन मंदिरातून कोविड-१९ काळात शेकडो भूकेल्या कुटुंबियांना मोफत अन्न पुरवले होते.
गेल्या वर्षी २०२० मध्ये दिल्ली इस्कॉनने जेवणाचे पाच लाख डबे पुरवले होते, आणि आता दुसऱ्या लाटेतही ते मदतीला पुढे सरसावले आहेत.
इस्कॉन द्वारकाचे प्रमुख प्रभू प्रद्युम्न यांनी दिलेल्या माहितीनुसार द्वारका येथील स्वयंपाकघरात या कार्याची तयारी १५ दिवस आधीपासूनच सुरू झाली होती. ते दिल्ली आणि द्वारकामध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण पुरवत आहेत. त्यासाठी फक्त एका हेल्पलाईन नंबरवर फोन करावा लागतो आणि त्यानंतर अन्न थेट दारापाशी आणून दिले जाते.
इस्कॉन गुरूग्रामच्या प्रदसेवन भक्त दास यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी २८९ परिवारांसाठी इस्कॉनने ६४७ अन्नपदार्थांचे डबे पाठवले. यापैकी सुमारे ७० टक्के अन्न हे घरांमध्ये पाठवले जाते, तर बाकीचे रस्त्यावरील गरजूंना किंवा जे गरजू मंदिरात येतात त्यांना दिले जाते.
‘स्वराज्य’ या वृत्तसंकेतस्थळाने याबद्दलचा सविस्तर अहवाल दिला आहे.