‘इस्कॉन बांगलादेश’चे चिन्मय कृष्ण दास यांना समर्थन, म्हणाले पाठीशी आहोत!

इस्कॉनने जारी केले निवेदन

‘इस्कॉन बांगलादेश’चे चिन्मय कृष्ण दास यांना समर्थन, म्हणाले पाठीशी आहोत!

बांगलादेशमध्ये अटक करण्यात आलेल्या चिन्मय कृष्णा दासवर इस्कॉनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इस्कॉनने जारी केलेल्या केलेल्या निवेदनात हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांचे समर्थन करत असल्याचे म्हटले आहे. चिन्मय कृष्ण दास यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला इस्कॉन हिंदू आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांचे रक्षण करण्यासाठी समर्थन देते. इस्कॉनने त्यांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन करण्यास नकार दिला नाही किंवा त्यापासून स्वतःला दूर केले नसल्याचे इस्कॉन बांगलादेशने म्हटले आहे.

खरे तर, इस्कॉन बांगलादेशचे सरचिटणीस चारू चंद्र दास यांनी एका निवेदनात म्हटले होते की, चिन्मय प्रभू यांची इस्कॉनमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून उचलण्यात येत असलेली पाऊले आणि वक्तव्यांना इस्कॉन जबाबदार नाही. मात्र, यावर आता इस्कॉनने आपली भूमिका स्पष्ट केली असून चिन्मय प्रभू यांच्या शांततापूर्ण निषेधाला आमचा पाठींबा असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”

जामा मशिद परिसरात शुक्रवारच्या नमाजापूर्वी रॅपिड ऍक्शन फोर्सची तुकडी तैनात

फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा

शोक आणि शॉक तेराव्यानंतर तरी संपणार काय?

दरम्यान, इस्कॉन बांगलादेशचे प्रवक्ते आणि पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना ढाका पोलिसांनी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) अटक केली होती. चिन्मय कृष्ण दास यांच्यासह त्यांच्या १९ साथीदारांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर बांगलादेश सरकारकडे त्यांच्या सुटकेसाठी भारतासह जगभरातील हिंदूंनी आवाहन केले. भारताच्या सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांनी तीच मागणी केली. याच दरम्यान, इस्कॉन बांगलादेशने त्यांच्याशी नाते तोडल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, अखेर इस्कोन स्पष्टीकरण देत त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे.

 

Exit mobile version