आयएसआयएसच्या (ISIS) दहशतवाद्यांनी रशियाच्या दक्षिणेकडील वोल्होग्राड येथील तुरुंगावर ताबा मिळवून तेथील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली आहे.
रशियाच्या फेडरल पेनिटेंशरी सर्व्हिसने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “दोषींनी (IK-१९ ) कारागृहाच्या कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. सध्या ओलीसांची सुटका करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळे जीवितहानीही झाली आहे.” या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे अनेक कैदी सामील असल्याचे रशियाच्या फेडरल सर्व्हिसने म्हटले आहे.
रशियन सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओनुसार, तुरुंगातील चार कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आल्याचे दिसत आहे, या व्हिडीओमध्ये ओलीस ठेवण्यात आलेले कर्मचारी रक्ताने माखलेले दिसत असून आयएसआयएसचा दहशतवादी एका ओलीसावर चाकू रोखून धरल्याचे दिसत आहे. दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेले कारागृह हे मॉस्कोच्या दक्षिणेस सुमारे ८५० किलोमीटर अंतरावर सुरोविकिनो शहरात आहे. कारागृहातील शिस्तपालन आयोगाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडल्याचे फेडरल पेनिटेंशरी सर्व्हिसने सांगितले.
हे ही वाचा :
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र बंद मागे घ्या!
गळाभेट, मग खांद्यावर हात, पंतप्रधान मोदी अन झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट !
‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा राजकीय पक्षांना अधिकार नाही, न्यायालयाने मविआला फटकारले
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही! म्हणत शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान, कैक तासांच्या चकमकीनंतर रशियन फोर्सला दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. रशियन फोर्सने दहशतवाद्यांना ठार करत त्यांच्या तावडीतून बंधकांची सुटका केली. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची मागणी काय होती, कारागृहावर हल्ला चढवत कर्मचाऱ्यांना बंधक का बनवले याची माहिती अध्याप समोर आलेली नाही.