संसार थाटण्यापूर्वीच असा झाला युवा अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू!

संसार थाटण्यापूर्वीच असा झाला युवा अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू!

पुण्यातील मराठी नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (२५) आणि तिचा होणारा नवरा शुभम देडगे (२८) यांचा गोवा येथे कार अपघातात मृत्यू झाला.

सोमवारी (२० सप्टेंबर) पहाटे हडफडे- म्हापसा येथे बागा खाडीत कार बुडाल्याने ही दुर्घटना घडली. गोव्यातील बागा येथील अरुंद रस्त्याने जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाली असलेल्या खाडीत कोसळली. त्यातच गाडी लॉक झाल्याने दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस निरीक्षक सुरज गवस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. गाडीचं स्टिअरिंग फिरल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली आणि खाडीत कोसळली. सकाळी सात वाजता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्या दोघांचे मृतदेह गाडीमधून बाहेर काढले. शुभम आणि ईश्वरी यांनी मदतीसाठी ‘आम्हाला वाचवा, वाचवा’ अशी आर्त हाक दिली होती. मात्र, लोक घरातून मदतीसाठी बाहेर पडेपर्यंत कार खाडीत बुडाली होती.

हे ही वाचा:

पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला

कोण होणार नवे हवाई दल प्रमुख?

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीच्या काचा फोडून दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि नंतर क्रेनच्या सहाय्याने गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली. शुभम आणि ईश्वरी हे गेल्या बुधवारी पर्यटनासाठी गोव्यात आले होते. बागा- हडफडे येथील एका हॉटेलात ते वास्तव्यास होते. पहाटेच ते आपल्या गाडीने पुणे येथे जाण्यास निघाले होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

ईश्वरी आणि शुभम गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झाले आणि पुढच्या आठवड्यात ईश्वरी आणि शुभम साखरपुडा करणार होते. मात्र त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वरीने नुकतंच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. सोबतच तिने हिंदी आणि मराठी मालिकांचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. अलीकडे ईश्वरी काही मराठी मालिकांमध्येही झळकली होती. यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्येही ईश्वरीने काम केलं आहे.

Exit mobile version