इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम

२०० धावा करणारा चौथा भारतीय, गेलचा विश्वविक्रम मोडला

इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम

भारताचा सलामीवीर इशान किशन याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत अवघ्या १२६ चेंडूंत २०० धावांची विक्रमी खेळी केली. २३ चौकार आणि ९ षटकारांसह त्याने केलेली ही खेळी विश्वविक्रमी खेळी ठरली आहे. चत्तोग्राम, बांगलादेशात सुरू असलेल्या या वनडेत इशानच्या या द्विशतकी खेळीमुळे भारताने ५० षटकांत ८ बाद ४०९ धावा केल्या. विराट कोहलीनेही ११३ धावांची खेळी करत त्यात भर टाकली.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ही खेळी साकारली. विशेष म्हणजे कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकत नसल्याने त्याच्याजागी इशानला संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

इशानने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा विक्रम या खेळीमुळे मोडित काढला आहे. वनडे क्रिकेटमधील गेलची खेळी सर्वोच्च होती. त्याने १३८ चेंडूंत द्विशतकी खेळी केली होती. २०१५च्या आयसीसी वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने हा खेळ केला होता. इशान किशनने त्याच्यापेक्षा १२ चेंडू कमी घेत २०० धावा केल्या. या द्विशतकामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवाग, रोहित शर्मा यांनी यापूर्वी वनडेत द्विशतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने द्विशतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायचे झाले तर मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड), ख्रिस गेल (विंडीज), फखर झमान (पाकिस्तान) यांनी ही कामगिरी केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना संधी

मंदी गायब.. कारच्या विक्रीने केला विक्रम

नवी मुंबईला मिळाले २० लाखांचे बजेट

विवो,ओप्पो, शाओमी भारतातून निर्यात करण्याच्या मार्गावर

इशान किशनने एकूण २१० धावा केल्या त्यात २४ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. इशान किशन या खेळीनंतर म्हणाला, की १५ षटके शिल्लक असताना मी बाद झालो पण टिकाव धरला असता तर मी ३०० धावाही केल्या असत्या. जेव्हा मी ९५ धावांवर खेळत होतो तेव्हा समोर असलेल्या विराटभाईने मला सबुरीने घ्यायला सांगितले.

Exit mobile version