ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द

गेल्या वर्षी श्रेयस अय्यर ‘ब’ गटात तर, ईशान किशन ‘क’ गटात होता.

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या वार्षिक करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून ईशान किशन आणि श्रेसय अय्यर यांची नावे वगळली आहेत. गेल्या वर्षी श्रेयस अय्यर ‘ब’ गटात तर, ईशान किशन ‘क’ गटात होता. घरगुती सामन्यांमध्ये न खेळल्याचा फटका त्यांना बसल्याचे सांगितले जात आहे.

अय्यर याने बुधवारी तमिळनाडूविरुद्ध रणजीच्या उपांत्य सामन्यात मुंबईतून खेळण्याची तयारी दर्शवली होती. मात्र बीसीसीएलच्या निर्णयावर त्याचा परिणाम झाला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. अय्यर याने पाठीचे दुखणे बळावल्याचे कारण सांगून बडोद्याविरुद्धच्या उपउपांत्य सामन्यातून माघार घेतली होती. तर, भारताच्या अंतिम संघात स्थान मिळत नसल्यामुळे ईशान किशन दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून मायदेशी परतला. त्याने रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याऐवजी आयपीएलच्या सरावास पसंती दिली. आता तो डी. वाय. पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही सातत्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निवड व्हावी, यासाठी ईशानने घरगुती क्रिकेट सामन्यांना प्राधान्य द्यावे, असे म्हटले होते.

श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचा करारबद्ध खेळाडूंची निवड करताना विचार झाला नाही. राष्ट्रीय संघातून खेळत नसताना खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य द्यावे, हे सर्व खेळाडूंना सांगितले आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा:

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले

पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

‘जे भुकेले आहेत, त्यांनाच संधी देणार’

या आठवड्यातच कर्णधार रोहित शर्मा याने जे भुकेले आहेत, त्यांनाच संधी देणार असे सूचक वक्तव्य केले होते. जर भूकच नसेल तर, त्यांना खायला देण्यात काहीच अर्थ नाही,’ असे रोहितने स्पष्ट केले होते.

Exit mobile version