संचारबंदीच्या निर्णयाचे बुमरँग उलटले?

संचारबंदीच्या निर्णयाचे बुमरँग उलटले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रात संचारबंदी लागू होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, ही साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. मात्र याचा उलट परिणाम घडून आलेला पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात आज रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता, कोणलाही निष्कार बाहेर पडण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील लोकांनी पुन्हा एकदा गावाची वाट धरलेली पहायला मिळाली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे

अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी

लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर

आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक

मुंबईतून लोकमान्य टिळक टर्मिनल वरून मोठ्या प्रमाणात उत्तर आणि पूर्व भारतासाठी रेल्वे सुटतात. त्यामुळे त्या स्थानकावर अनेक स्थलांतरित मजूरांनी गावी परतण्यासाठी झुंबड केलेली पहायला मिळाली. ठाकरे सरकारमधील कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल या कामगारांना शहरातच थांबण्याची विनंती केली होती. मात्र या आवाहनाचा कोणताही परिणाम झालेला पहायला मिळत नाही.

मजूर वर्गाप्रमाणेच मध्यमवर्गीय सामान्य नागरिकांनी देखील गावची वाट धरली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या, एस.टी स्टँड, बस स्थानके याठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव असल्यामुळे लोक पुन्हा गावी जात असल्याचे समजत आहे.

याशिवाय मुंबईतच राहणाऱ्या नागरीकांनी ठिकठिकाणी खरेदीसाठी झुंबड केल्याचे देखील पहायला मिळाले. डी-मार्ट ते इतर सामानाच्या अनेक दुकांनांसमोर नागरीकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. संचारबंदीच्या भीतीमुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करायला कालपासूनच सुरूवात केली आहे.

एकंदरीतच, गर्दी टाळण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे बुमरँग सरकारवरच उलटल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

Exit mobile version