शालिमार एक्स्प्रेस पार्सल व्हॅनला आग लागण्याचे संभाव्य कारण समोर आले आहे. सदोष कॅमेरा बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. कॅमेरा बॅटरीचा संपर्क ज्वलनशील वस्तूशी आल्यामुळे हे घडल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या शनिवारी सकाळी ८;४० च्या सुमारास नाशिकरोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तीनमध्ये ट्रेन प्रवेश करत असताना इंजिनच्या मागे असलेल्या लगेज व्हॅनला आग लागल्याचे लक्षात आले. व्हॅनमध्ये अंदाजे २३ टन सामान होते. या पार्सल व्हॅनमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, नेलपॉलिश, रेक्झीन, बिडी आणि कापड अशा पाच खेपा होत्या. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “नेल पॉलिश आणि रेक्झीन अत्यंत ज्वलनशील आहेत आणि त्यामुळे ही आग लागली”. सहाय्यक लोको पायलट (ALP) निरज कुमार यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल आणि परिस्थिती संभाळण्याकरिता आम्ही त्याच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस करणार आहोत.”
हे ही वाचा:
मुंबई-ठाण्यादरम्यान उभी राहणार सिनेसृष्टी
सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…
चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड
भारत जोडोसाठी KGF-2 जोडो पडले महागातं
ट्रेन जिथे थांबते तिथे लोकोमोटिव्हची तपासणी करणे हे सहाय्यक लोको पायलटचे कर्तव्य आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, “एएलपीने लोकोमोटिव्हची तपासणी करताना पार्सल व्हॅनमधून धूर निघत असल्याचे पाहिले. त्यांनी ताबडतोब स्टेशन अधिकाऱ्यांना सावध केले. त्याने सिग्नलची बाजू हिरव्यापासून लाल रंगात बदलली. त्यानंतर, पार्सल व्हॅनमधून इंजिन सुरक्षिततेसाठी वेगळे केले गेले. आग लागू नये यासाठी पार्सल व्हॅनही प्रवाशांच्या डब्यांपासून वेगळी करण्यात आली होती.” एएलपीने तात्काळ लोकोमोटिव्हमध्ये ठेवलेल्या अग्निशामक यंत्रांना शोधले आणि आग विझवण्याच्या कामात उतरले. सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, “उच्च अधिकार्यांची एक समिती स्थापन करण्यात आली असून ती आगीचे नेमके कारण ठरवेल.”