एनडीएच्या संसदीय पक्षाची आज दिल्लीत बैठक पार पडली.या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएचा प्रमुख नेता म्हणून सर्वांनी एकमताने निवड केली.यावेळी नरेंद्र मोदींनी सभेला संबोधित केले.एनडीए ही भारतातील सर्वात यशस्वी निवडणूकपूर्व आघाडी असल्याचे ते म्हणाले.तसेच सर्वांनी विश्वास दाखविल्याबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानले आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.यावेळी मोदींनी आपल्या भाषणात ४ जून म्हणजेच मतमोजणीचा दिवस आठवत ईव्हीएम मशिन्सचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा ४ जूनला निकाल येत होता, तेव्हा मी माझ्या कामात व्यस्त होतो.तेव्हा फोन वगैरे यायला सुरु झाले.मी एकाला म्हणलो की , हे आकडे आहेत ते ठीक आहेत.पण मला एक सांगा की, ‘ईव्हीएम जिवंत आहे की मेली’?.कारण या लोकांनी ठरवून ठेवले होते की भारताच्या लोकशाहीवर आणि लोकशाही प्रक्रियेवर लोकांचा विश्वासच उठला पाहिजे.आणि सतत ईव्हीएम मशीन्सला शिव्या देत असत.
हे ही वाचा:
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी संविधानापुढे झाले नतमस्तक!
पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?
टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!
सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत
मला तर असे वाटतं होते की, हे लोक यंदा ईव्हीएमच्या अंत्यविधीची मिरवणूक काढतील.परंतु ४ जूनला जस-जशी संध्याकाळ होत गेली, तसे त्यांच्या तोंडाला कुलूप लागले, ईव्हीएमने त्यांची तोंडे बंद केली.ही ताकद आहे भारताच्या लोकशाहीची, असे माजी पंतप्रधान मोदी म्हणाले.
नवनिर्वाचित खासदारांना अलर्ट करत मोदी म्हणाले की, तुम्ही विकासाची कामे करा. चांगली कामे करा. देशाची प्रगती करा. केवळ ब्रेकिंग न्यूजने देश चालणार नाही.विरोधक हे आमचे विरोधक आहेत पण ते देशाचे विरोधक होऊ शकत नाहीत.त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, दिल्लीमध्ये आजच्या बैठकीमध्ये एनडीएचे सर्व खासदार आणि राज्यातील मुख्यंमत्री उपस्थित होते.सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची एनडीएचा प्रमुख नेता म्हणून निवड केली.९ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे.