इर्शाळवाडी गावात अद्याप मदतकार्य आणि बचावकार्य सुरू असून साधारण ४० तासांच्या शोधकार्यानंतर शुक्रवार, २१ जुलै रोजी सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले. यानंतर मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.
तसेच राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. दुर्घटनास्थळ उंचावर असल्याने आणि तिथे पोहचण्याचा मार्ग खडतर असल्याने कोणतीही तांत्रिक साधने मदतीसाठी वापरता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शिवाय माती, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. सध्या एनडीआरएफ आणि टीटीआरएफचे सुमारे १०० हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी घटनास्थळी आहेत.
शुक्रवारी सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले. कमल मधू भुतांब्रा (४३), मधु नामा भुतांब्रा (४५), कान्ही रवी वाघ (४५), हासी पांडुरंग पारधी (५०), पांडुरंग पारधी (६०), रवींद्र पदू वाघ (४६) अशी सहा जणांची नावे आहेत. गुरुवारी १६ आणि शुक्रवारी सहा असे एकूण २२ मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.
हे ही वाचा:
देशातील सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकातील काँग्रेस नेते शिवकुमार
पश्चिम बंगालमध्येही भाजप उमेदवाराची नग्न धिंड काढली होती, त्याचे काय?
फोगाट, बजरंग निवडीसंदर्भात शनिवारी न्यायालय देणार निर्णय
अनधिकृत शाळांबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा
दुर्घटनाग्रस्त भागातील नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बचाव कार्यात अद्याप ९८ व्यक्तींना वाचविण्यात यश आले आहे. २८८ पैकी उर्वरित १०९ लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.