कानपूरमधील घटना ताजी असताना पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट समोर आला आहे. पंबमधीजाल भटिंडा येथे रेल्वे ट्रॅकवर लोखंडी सळ्या सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोमवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ही घटना समोर आली. मालवाहतूक ट्रेनच्या लोको पायलटने वेळेवर ब्रेक लावल्याने दुर्घटना टळली.
पोलिसांनी सांगितले की, हा काही बदमाशांचा कट होता का, याचा तपास सुरू आहे. आज पहाटे ३ वाजता एक मालगाडी भटिंडा-दिल्ली रेल्वे मार्गावरून जात होती. मात्र, ट्रॅकच्या मध्यभागी ठेवलेल्या लोखंडी सळ्यांमुळे, ट्रेनला सिग्नल मिळाला नाही, परिणामी काही तास उशीर झाला, असे तपास अधिकारी शविंदर कुमार यांनी सांगितले. घटनास्थळाची पाहणी करून आतापर्यंत ९ लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहेत, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा :
अमेरिकेत मोदींच्या भाषणादरम्यान श्रोत्यांना काशी मथुरेच्या मंदिरांची आठवण
प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन
भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे नरेंद्र मोदींचे लक्ष्य
अमेरिका- इंडिया ही नव्या जगाची ‘एआय’ शक्ती
दरम्यान, मागील अनेक दिवसांमध्ये ट्रेन उलटवण्याच्या कटाच्या बातम्या समोर आल्या आहेत. अज्ञात व्यक्तींकडून रेल्वे रुळावर घरगुती सिलेंडर, लोखंडी पत्रा, विजेचा लोखंडी खांब, सिमेंटचे ब्लॉक आणि फिश प्लेट ठेवून ट्रेन उलटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, लोकोपायलट, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. दरम्यान, देशात वाढत्या रेल्वे कटाच्या घटनांना दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ‘रेल जिहाद’ असे नाव दिले आहे.