इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरू असताना आता त्याचे पडसाद वर्ल्डकप फुटबॉलमध्ये उमटू लागले आहेत. इराणच्या पुरुष फुटबॉल संघाने या स्पर्धेत हिजाबविरोधाला वेगळ्या कृतीतून पाठिंबा दर्शविला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने इराणची फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील मोहीम सुरू झाली. त्या सामन्याआधी राष्ट्रगीत म्हणताना सर्व इराणी खेळाडू तोंड मिटून उभे होते. कुणीही राष्ट्रगीत गायले नाही. इराणमध्ये सध्या हिजाबवरून आंदोलने सुरू आहेत. महसा अमिनी या महिलेला पोलिस ठाण्यात मारहाण झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिने हिजाबसंदर्भातील नियमांचे पालन केले नव्हते. पण तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये महिलांनी रस्त्यावर उतरून हिजाबसक्तीला विरोध दर्शविला. अनेक महिलांनी आपले केस कापून तर काहींनी हिजाब जाळून आपला निषेध नोंदविला.
हे ही वाचा:
त्याच्यासाठी तरी राहुल गांधी ‘पंतप्रधान’ होतील?
पनवेलमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ
बेंगळुरूतील स्फोटाचा मास्टरमाइंड शरीक ISIS शी संबंधित
हे शहर वाहनचालकांसाठी बनविण्यात आले आहे का?
या महिलांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण फुटबॉल संघाने राष्ट्रगीत न म्हणण्याचा निर्णय़ घेतला. १९७९मध्ये इराणमध्ये इस्लामिक राजवट आली आणि तेव्हापासून तिथे शरिया लागू झाला. पण नेतृत्वाला अशापद्धतीने वारंवार विरोध केला गेला.
या फुटबॉलपटूंप्रमाणेच इराणमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनीही हिजाबविरोधाला पाठिंबा दर्शविला. अयातोल्ला खोमेनी सरकारविरोधात या दोघींनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना अटक करण्यात आली. हेनगामे गाझियानी आणि कतायोन रिआही यांनी हा निषेध नोंदविला.या दोघींनी हिजाब न घालताच सार्वजनिक ठिकाणी येण्याचे ठरविले.
याआधी २२ वर्षीय महसा अमिनीची हत्या झाली होती. हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी तिला मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. तेव्हापासून इराणमध्ये हिजाबविरोधाची लाट आली आहे.