28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषइस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!

इराणची इस्रायलला धमकी

Google News Follow

Related

रशिया-युक्रेन आणि पॅलेस्टाईन-इस्रायलनंतर आता जगात आणखी एका युद्धाचा आवाज ऐकू येत आहे. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून नव्या युद्धाला निमंत्रण दिले आहे. आता जगाला इस्रायलच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. इस्रायलने इराणकडून बदला घेईल आणि प्रत्युत्तर देईल अशी शपथ घेतली आहे. मात्र, इस्रायल इराणवर कधी क्षेपणास्त्र डागणार हे निश्चित नाही. दरम्यान, इस्रायलवर हल्ला करून जगाला चकित करणाऱ्या इराणने पुन्हा एकदा इस्रायलला धमकी दिली असून बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारने प्रत्युत्तर दिल्यास इराण असे शस्त्र तैनात करेल, जे यापूर्वी कधीही वापरले गेले नाही.

दरम्यान, इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी सोमवारी(१५ एप्रिल) सांगितले की, इराणने शनिवारी आणि रविवारी केलेल्या हल्ल्याला आमचा देश प्रत्युत्तर देईल.पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे.दरम्यान, इस्रायलच्या प्रत्युत्तरा अगोदर इराणने म्हटले की, इस्रायलकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला “सेकंदात प्रत्युत्तर” दिले जाईल आणि आवश्यक असल्यास “पूर्वी कधीही न वापरलेली शस्त्रे” तैनात केले जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे.

हे ही वाचा:

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

इस्रायलचे लष्करी प्रमुख हारझी हेलेवी म्हणाले की, इस्रायल त्याच्या पुढील पावलांचा विचार करत आहे आणि १३ एप्रिलच्या इराणी हल्ल्याला “प्रत्युत्तर दिले जाईल” तर इराणचे उप परराष्ट्र मंत्री अली बगेरी कान यांनी ठामपणे सांगितले की, आमच्या प्रत्युत्तराच्या गतीचा कालावधी अगदी काही सेकंदाचा असेल.

दरम्यान, इराणने शनिवारी(१३ एप्रिल) १७० ड्रोन आणि १५० क्षेपणास्त्रे डागली. त्यातील ३० ही क्रूझ आणि १२० ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे होती. त्यातील ९९ टक्के क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई संरक्षण दलाने आणि लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या लष्कराच्या मदतीने निकामी केली गेली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा