हिजाब न घालता गाणे गायले, इराणकडून गायिकेला अटक!

गायिकेचे वकील मिलाद पणहीपौर यांनी दिली माहिती

हिजाब न घालता गाणे गायले, इराणकडून गायिकेला अटक!

हिजाबचा वाद अजूनही सुरूच आहे. एका महिला यूट्यूब गायिकेने हिजाबशिवाय लाईव्ह गाणे गायल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. गायिकेचे वकील मिलाद पणहीपौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय महिला गायिका प्रस्तो अहमदीला अटक करण्यात आली आहे. गायिकेला शनिवारी (१४ डिसेंबर) माझंदरनची राजधानी सारी येथून अटक करण्यात आली आहे.

गायिका प्रस्तो अहमदीच्या कॉन्सर्टवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, प्रस्तो अहमदीने स्लीव्हलेस आणि कॉलरलेस कपडे घातले होते. यावेळी तिने हिजाब परिधान केला नव्हता. गायिकेने आपले केसही मोकळे सोडले होते. व्हिडिओमध्ये गायिका तिच्या चार पुरुष साथीदारांसोबत होती. यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गायिका अहमदीने परवा तिच्या यूट्यूबवर हा व्हिडिओ शेअर केला होता, “मी प्रस्तो, एक मुलगी आहे जिला तिच्या आवडत्या लोकांसाठी गाण्याची इच्छा आहे. हा एक हक्क आहे ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. त्या भूमीसाठी पूर्ण उत्साहाने गाणे गात असल्याचे आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. १.४ दशलक्षाहून अधिक लोकांनी हा कॉन्सर्ट पाहिला आहे.

हे ही वाचा : 

अतुल सुभाष प्रकरण, पत्नीसह सासरच्या मंडळींना अटक!

मतलबी वारे सुस्साट… काँग्रेस फुटणार, मविआ बुडणार?

स्वार्थी घटनादुरुस्तीचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले, त्याची पुनरावृत्ती गांधी परिवाराने केली!

अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला होणार उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

गायिकेच्या अटकेच्या आदल्या दिवशी इराणच्या न्यायव्यवस्थेने तिच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. अधिकाऱ्यांनी आरोप किंवा तिची अटकेची जागा उघड केलेली नाही. तिच्या बँडमधील दोन संगीतकार, सोहेल फगिह नासिरी आणि एहसान बैरागदार यांनाही त्याच दिवशी तेहरानमध्ये अटक करण्यात आली होती.

दरम्यान, १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर महिलांच्या गाण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतर पुरुषांसमोर गाणे आणि नृत्य करण्यास बंदी घालण्यात आली. स्त्रिया गाण्याचे काही भागच गाऊ शकतात, मात्र त्यांना केवळ महिलांसाठी असलेल्या सभागृहात गाण्याची परवानगी आहे. याशिवाय इराणमधील इस्लामिक कायद्यानुसार महिला ज्या पुरुषांना ओळखत नाहीत त्यांच्यासमोर हिजाबशिवाय येऊ शकत नाही. या कायद्यांचे उल्लंघन केल्यास कठोर दंड होऊ शकतो.

Exit mobile version