अयोध्येतील मुस्लीम नेते आणि बाबरी मशीद प्रकरणातील समर्थक इक्बाल अन्सारी यांनी श्री राम जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांवर फुलांचा वर्षाव केला. त्यांचे वडील दिवंगत हाशीम अन्सारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून इक्बाल अन्सारी देखील अयोध्येत हिंदू-मुस्लीम आणि बंधुत्वाचा दिवा लावत आहेत.
रविवारी (६ एप्रिल) श्री राम नवमीनिमित्त त्यांनी अयोध्येत येणाऱ्या भाविकांवर फुले उधळली आणि श्री रामांच्या घोषणा देवून भाविकांचे स्वागत केले. ही कौटुंबिक परंपरा पुढे नेताना अन्सारी खूप आनंदी दिसत होते.
बाबरी मशिदीचे समर्थक इक्बाल अन्सारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ही रामनगरी आहे. भगवान रामांचा जन्म येथे झाला. आपण अयोध्येचे रहिवासी आहोत हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आज अयोध्येत येणाऱ्या आमच्या पाहुण्या भक्तांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. भाविकांवर आम्ही पुष्पवृष्टी केली आणि यापुढेही करत राहू.
हे ही वाचा :
विविध गटांकडून ‘ब्राह्मणां’ना केले जाते आहे लक्ष्य…माधव भांडारी यांचा जुना व्हीडिओ व्हायरल
मुलं चोरीच्या अफवेमुळे काय घडलं ?
सत्ता गेली; आता ‘आप’ नेते बनले चक्क युट्युबर!
मोदींनी उद्घाटन केलेल्या ‘पंबन रेल्वे ब्रिज’ची वैशिष्ट्ये बघा
ते पुढे म्हणाले, अयोध्या पवित्र आहे. याठिकाणी देवदेवतांचा वास आहे. येथे येणारे लोक चांगल्या हेतून येतात. भाविक शरयू नदीमध्ये स्नान करतात, हनुमान गढीला भेट देतात आणि प्रभू राम लल्लाचे दर्शन घेतात. अयोध्येत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सलोखा आहे. इक्बाल अन्सारी यांच्यासोबत अयोध्येतील प्रतिष्ठित नागरिकांनीही पुष्पवृष्टीमध्ये सहभाग घेतला. याचा व्हिडीओ देखील समोर आला असून अनेक जणांनी लाइक्स करत कौतुक केले आहे.