सोलापूर येथे लाडकी बहीण महामेळावा व विविध कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक आयपीएस अतुल कुलकर्णी यांचा विशेष सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. महिला सशक्तिकरण अभियानासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले.
हे ही वाचा:
रतन टाटांचा एक अनोखा पैलू, ‘मोठी स्वप्ने पाहणे आणि इतरांना काहीतरी देण्याची आवड’
‘रतन टाटा यांना भारतरत्न द्या’
‘लाडली बहना योजने’विषयीचे वक्तव्य भोवले; संजय राऊतांवर गुन्हा दाखल
पोलिस अधिकारी म्हणून अतुल कुलकर्णी हे महिला सशक्तीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेत आले आहेत. त्याशिवाय, अमलीपदार्थ, महिलांवरील अत्याचार या बाबतीतही त्यांनी काम केलेले आहेत. भायंदर ठाणे येथे उपअधीक्षक असताना त्यांनी पोलिस आणि जनता यांच्यातील समन्वय वाढविण्याचा आणि त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण जेव्हा लोक पोलिसांकडे येण्यास तयार नसतात तेव्हा आपणच त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे या भावनेतून कुलकर्णी यांनी काम केले.