जगातील सर्वात मोठी टी-ट्वेंटी स्पर्धा इंडियन प्रीमियर लीग यांच्या उत्तराला आजपासून सुरुवात होत आहे. अबु धाबी येथे ही स्पर्धा खेळवली जात आहे. हे स्पर्धा ९ एप्रिलला सुरु झाली असून ३० मे पर्यंत चालणार होती. पण कोविड महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही स्पर्धा मध्यात थांबविण्यात आली होती. पण आता या स्पर्धेचे उत्तरार्ध आजपासून सुरू होत आहे. आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात आत्तापर्यंत २९ सामने खेळले गेले होते. तर उर्वरित ३१ सामने हे आता स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळले जाणार आहेत.
आयपीएलच्या आजच्या पहिल्याच सामन्यात आजवरचे सर्वात यशस्वी संघ ठरलेले मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. आयपीएल २०२१ च्या हंगामाची सुरुवात त्यांच्याच सामन्याने झाली होती. तर आता पुन्हा स्पर्धेच्या उत्तरार्धाची सुरुवातही याच दोन संघाच्या सामने होणार आहे. एकीकडे सर्वात यशस्वी टी-ट्वेंटी कप्तान अशी ख्याती असलेला महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई संघाचे नेतृत्व करत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघ आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ आणि कप्तान म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजच्या या सामन्यात लोकांना उत्तम दर्जाच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आनंद लुटता येणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता स्टार स्पोर्ट वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
हे ही वाचा:
सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा
चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?
‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’
मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे
सध्या आयपीएल स्पर्धेतील गुणतक्ता पहिला तर दिल्लीचा संघ हा प्रथम स्थानावर आहे. तर त्या पाठोपाठ बंगलोर, चेन्नई आणि मुंबई यांचे संघ आहेत. राजस्थान, पंजाब, कलकत्ता आणि हैद्राबाद हे अंतिम चार स्थानांवर असलेले संघ आहेत.