27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषसप्टेंबरमध्ये परतणार आयपीएलचे धुमशान

सप्टेंबरमध्ये परतणार आयपीएलचे धुमशान

Google News Follow

Related

इंडियन प्रिमियर लिगचा २०२१ चा उरलेला हंगाम हा सप्टेंबरमध्ये पूर्ण केला जाणार आहे. १९ किंवा २० सप्टेंबरला आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होऊ शकतात. हे सगळे सामने हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जाणार आहेत. एप्रिलमध्ये सुरु झालेला आयपीएल २०२१ चा हंगाम हा मे महिन्यात स्थगित करावा लागला. स्पर्धेतील काही खेळाडू कोविडच्या कचाट्यात अडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

भारतात सध्या कोविडचे थैमान सुरू असून याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. कोविडच्या या सावटात काही क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या तर काही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी पर्वणी असणारी आयपीएल ही स्पर्धा देखील कोविडच्या कारणामुळे मध्यातच स्थगित करण्यात आली. पण त्याच वेळी ही स्पर्धा रद्द झाली नसून भविष्यात हा हंगाम पूर्ण करण्यात येईल असे संबंधित अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत होते. त्याप्रमाणेच आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा यूएई मध्ये खेळवली जाणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचा तुघलकी निर्णय, १३०० कंत्राटी डॉक्टरांना केले सेवामुक्त

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

शिवसेनेची झाली सोनिया सेना

सुशील कुमारचे नोकरीतून निलंबन

१९ किंवा २० सप्टेंबर रोजी आयपीएलचा हंगाम पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर १० ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालेल. आयपीएल २०१९ हंगामातील ३१ सामने बाकी असून हे सर्व सामने २१ दिवसात पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी १० डबल हेडर्स म्हणजेच एका दिवशी दोन सामने होतील तर ७ सिंगल हेडर्स म्हणजे एका दिवशी एकच सामना होईल तर प्ले ऑफचे ४ सामने असतील.

भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड विरुद्धची मालिका ही १४ सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हे थेट युएईमध्ये दाखल होऊन आपला कालखंड पूर्ण करतील असे समजत आहे. तर २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत कॅरेबियन प्रीमियर लीग खेळवली जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून कॅरिबियन प्रीमियर लीगच्या आयोजकांना विनंती करून ही स्पर्धा काही काळ आधी संपवावी असे सांगण्यात येण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा