भारतातील टी-२० क्रिकेटची मोठी स्पर्धा असलेली आयपीएलसुद्धा कोरोनामुळे रद्द झाली आहे. तरीसुद्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) या स्पर्धेचा उर्वरित टप्पा पूर्ण करण्याचे काही पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत.
आत्तापासूनच आयपीएल टप्पा-२ चा विचार केला जात आहे. त्यासाठी विविध पर्यायांचा विचार देखील केला जात आहे. सुधारित बायो बबल, उपलब्ध वेळ किंवा अगदी कोविड-१९ ची सुधारती परिस्थिती असली तरीही आता दुसरा टप्पा भारतात खेळवला जाणार नाही हे नक्की. अनेक विदेशी खेळाडूंना सध्या मायदेशी परतण्याची घाई झाली आहे आणि ते इतक्यात भारतात परततील याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे सध्या भारताचा पर्याय बंद झाला आहे. परदेशी खेळाडूंच्या सहभागाशिवाय आयपीएल म्हणजे देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या ‘मुश्ताक अली’ स्पर्धेचेच जरा झगमगते रुप इतकेच उरेल.
हे ही वाचा
केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या गाडीवर हल्ला
देशातील कोविडचे एक उत्परिवर्तन लवकरच नष्ट होण्याची शक्यता
कोविड लसींना पेटंटच्या पिंजऱ्यातून सोडवण्यास अमेरिकेचा पाठिंबा
बंगालमधल्या हिंसाराबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचे पथक बंगालमध्ये दाखल
क्रिकेट मंडळातील काही उच्चपदस्थांच्या मते आता आयपीएल परदेशातच खेळवावी लागणार आहे. त्यासाठी काही जागांचा विचार देखील केला गेला आहे. बीसीसीआयला फक्त त्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तीन पर्यायांचा विचार केला गेला आहे.
पहिला पर्याय म्हणजे, स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाऊ शकते. यापूर्वी ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली गेली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तिथे टी२० विश्वचषक देखील खेळवला जाऊ शकतो. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा १४ सप्टेंबर रोजी संपल्यावर मग आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते
दुसरा पर्याय म्हणून ब्रिटनचा देखील विचार केला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. तिथे देखील सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. आयपीएल नंतर खेळाडू युएईला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी जाऊ शकतात.
तिसरा पर्याय म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये देखील ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. मात्र त्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांची धोरणे बदलणे आवश्यक ठरणार आहे.
(टाईम्स ऑफ इंडियातील Suspended for now, IPL 2021 may return as BCCI mulls over UK, UAE and Australia as potential venues या के श्रीनिवास राव यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद)