राजस्थान रॉयल्सने घोषणा केली आहे की, आयपीएल २०२५च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी संघाची कमाण रियान परागकडे देण्यात आली आहे. कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा संघाचे नेतृत्व सांभाळतील.
युवा अष्टपैलू खेळाडू पराग २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतर २६ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स आणि ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या घरेलु मैदानावर होणाऱ्या सामन्यांतही तोच कर्णधार असणार आहे.
फ्रँचायजीच्या मते, संजू सॅमसन अद्याप विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी पूर्णतः फिट नाही. मात्र, तो फलंदाज म्हणून खेळत राहील आणि पूर्णतः तंदुरुस्त झाल्यावर संघाचे नेतृत्व करेल.
फ्रँचायजीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “संजू सॅमसन रॉयल्स संघाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा पर्यंत संजू विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी पूर्ण फिट होत नाही, तोपर्यंत तो फलंदाज म्हणून संघाला योगदान देईल. पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर तो पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल.”
संजू सॅमसन नुकतेच बोटाच्या शस्त्रक्रियेतून सावरूनन संघात दाखल झाला आहे. फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे उर्वरित सामन्यांतून तो बाहेर पडला आणि त्यानंतर बोटावर शस्त्रक्रिया करावी लागली.
रियान परागला कर्णधारपद देणे हा राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. त्याने आसमच्या घरेलु संघाचे नेतृत्व करताना उत्तम नेतृत्वगुण दाखवले आहेत. तसेच, तो अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असून, संघाच्या रणनीतीची त्यांना चांगली जाण आहे.
हेही वाचा :
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
भरवेगात स्कुटी चालविणाऱ्याला जाब विचारला म्हणून एकाची हत्या
दिल्लीमधील ‘अकबर रोड’ लिहिलेल्या साइन बोर्डला काळे फासून महाराणा प्रताप यांचा लावला फोटो
राजस्थान रॉयल्सचे पहिले दोन घरच्या मैदानात सामने २६ आणि ३० मार्च रोजी गुवाहाटीतील एसीए स्टेडियममध्ये खेळवले जातील. त्यानंतर जयपूरच्या सवाई मान सिंह स्टेडियमवर उर्वरित सामने होणार आहेत.
राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. गेल्या हंगामात संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिला आणि प्लेऑफमध्ये पोहोचला होता, मात्र एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्याने अंतिम फेरी गाठू शकला नाही.