आयपीएल २०२५ : दहाव्या षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी!

संध्याकाळच्या सामन्यांमध्ये होणार, दुपारच्या सामन्यांमध्ये चेंडू बदलता येणार नाही

आयपीएल २०२५ : दहाव्या षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी!

आयपीएलने संध्याकाळच्या सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात १०व्या षटकानंतर चेंडू बदलण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाच्या प्रभावाशी सामना करता येईल. अतिरिक्त चेंडू बदलण्यासाठीचा विनंती अर्ज ऑन-फिल्ड पंच आपल्या विवेकबुद्धीनुसार स्वीकारतील किंवा नाकारतील. हा निर्णय गुरुवारी सर्व १० फ्रँचायझींच्या कर्णधारांसोबत झालेल्या बैठकीत घेतला गेला. ज्यामध्ये शनिवारी सुरू होणाऱ्या आयपीएल २०२५ साठी प्लेइंग कंडिशन्सवर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी या नव्या नियमासंदर्भात सर्व फ्रँचायझींना अधिकृत नोटीस पाठवण्यात आली, जी ईएसपीएन क्रिकइन्फोनेही पाहिली आहे.

आत्तापर्यंत चेंडू बदलण्याचा निर्णय पूर्णतः पंचांच्या हातात असायचा. जर पंचांना असे वाटले की चेंडू खूप खराब झाला आहे किंवा फारच ओला झाला आहे, तेव्हाच तो बदलण्याची परवानगी दिली जायची. मात्र, फ्रँचायझी संघ हेच निर्णय अधिक स्वायत्तपणे घेऊ शकतील, अशी मागणी करत होते.

नवीन नियम काय सांगतो?

गोलंदाजी संघासाठी फायद्याचे ठरणार?

अँडी फ्लॉवर यांनी काय सांगितले?

फ्लॉवर म्हणाले, “हा नियम मला खूप आवडला. कर्णधाराला दुसऱ्या डावात चेंडू बदलण्याचा पर्याय मिळणे, ही चांगली गोष्ट आहे. मी नेहमीच विचार करत असे की, हा निर्णय पंचांच्या ऐवजी कर्णधाराच्या हातात का नाही? जर चेंडू बदलला गेला, तर यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी यामध्ये समतोल राखला जाईल, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक बनेल. विशेषतः जिथे दव जास्त असते, तिथे हा नियम खूप प्रभावी ठरेल.”


आयपीएलमध्ये पुन्हा लाळ (सलायवा) वापरण्याची परवानगी

फ्लॉवर म्हणाले, “माझ्या मते, टी२० क्रिकेटमध्ये हा नियम फारसा महत्त्वाचा नाही. सलायवा वापरणे ठीक आहे, फक्त खेळाडूंनी साखर खाण्याची सवय लावू नये! (हसत) काही वेळा चॉकलेट किंवा साखर खाऊन चेंडू अधिक चमकवण्याचा प्रयत्न केला जातो!”

Exit mobile version