जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!

राजस्थानकडून बेंगळुरूचा पराभव

जोस बटलरच्या १०० धावा विराटच्या ११३ धावांपेक्षा सरस!

जोस बटरलची नाबाद शंभरी आणि संजू सॅमसनच्या ४३ चेंडूंत ६९ धावांमुळे राजस्थानने शनिवारी जयपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात १८४ धावांचे लक्ष्य सहज पार केले. विराट कोहलीची ७२ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी बेंगळुरूचा पराभव टाळू शकली नाही आणि संघाला पाच सामन्यांत सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानने हा सामना १९.१ षटकात आणि सहा विकेट राखून जिंकला.

जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांची पिसे काढली. राजस्थानचे युझवेंद्र चहल आणि आर. अश्विन या फिरकीपटूंची कामगिरी बेंगळुरूच्या मयंक डागर आणि हिमांशू शर्मा यांच्यापेक्षा कितीतरी पटीने सरस होती. बटलर हा आयपीएलच्या १००व्या सामन्यात शतक ठोकणारा के. एल. राहुलनंतरचा दुसरा फलंदाज ठरला. हे बटलरचे आयपीएलमधील सहावे शतट ठरले. त्याने आता ख्रिस गेलची बरोबरी केली आहे. या विजयामुळे राजस्थान हा गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

हे ही वाचा.. 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची ‘छाप’!

१९८४ साली दोन सीट ते २०२४ला ४०० जागा पार करण्याचे लक्ष्य!

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा गायब

पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!

बेंगळुरूचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्रक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर ढेपाळला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद होऊनही संजू सॅमसन याणि जोस बटलर यांनी संयमी खेळी केली. विराट कोहलीचे अर्धशतक हे सर्वांत धीमे शतक ठरले. त्याने ६७ चेंडूंमध्ये शतक ठोकले. १९व्या षटकांत बेंगळुरूचा संघ अवघ्या चार धावा करू शकला. नांद्रे बर्गरच्या षटकात कोहली ९८ वरून १०० धावा करू शकला. हे त्याचे टी-२०तील नववे शतक ठरले.
कर्णधार फाफ डू प्लेसिस याने विराट कोहलीच्या साथीने १२५ धावांची भागीदारी केली. मात्र त्यात त्याचा वाटा होता, अवघा ३३ चेंडूंत ४४ धावांचा. ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. तर, सौरव चौहान याने सहा चेंडूंमध्ये अवघ्या नऊ धावा केल्या. कॅमरून ग्रीन याने सहा चेंडूंत अवघ्या पाच धावा केल्या.

बेंगळुरूची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही सुमार झाले. रीस टॉपलीला झटपट व यशस्वी जयस्वालला शून्यावर बाद करून बेंगळुरूने सुरुवात चांगली केली. त्यामुळे राजस्थानचे फलंदाज पाच षटकांत केवळ ३४ धावा करू शकले. मात्र त्यानंतर सॅमसन आणि बटलर यांनी मयंक डागरला दोन षटके आणि तीन चौकार लगावून पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात २० धावा केल्या. या दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूंत १४८ धावांची भागीदारी केली.

Exit mobile version