दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शॉ याला काऊंटी सामन्यादरम्यान गुडघ्याला जखम झाली होती आणि तो या दुखापतीतून सावरू लागला आहे. तर, कोलकाता नाइट रायडरने खेळात सातत्य नसलेल्या शार्दुल ठाकूरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे संघाकडे लिलावाच्या आधीच १०.७५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
आयपीएलसारख्या टी-२० सामन्यांनुसार मनीष पांडे आणि सरफराज खान यांची कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि संघ संचालक सौरव गांगुली यांचा शॉ याच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. तो पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत आयपीएल सुरू होण्याआधी फिट होईल, अशी आशा त्यांना आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!
कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!
तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!
दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!
शार्दुल मनाजोगती कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. ना त्याची गोलंदाजी कमाल दाखवू शकली आहे ना, फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला आहे. कोलकात्याकडे शार्दुलला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे १०.७५ कोटी रुपये अतिरिक्त जमा झाले आहेत. आणखी पाच कोटी टाकल्यास संघाच्या खात्यात चांगले पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे हा संघ मिनी लिलावात चांगल्या खेळाडूसाठी प्रयत्न करू शकतो.
बेंगळुरू आणि हैदराबादने अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद आणि मयंक डागर यांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, जो रूट याने कसोटी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रूट गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचा केवळ एक सामना खेळला होता.२६ नोव्हेंबर रोजी सर्व संघ त्यांनी राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करेल. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी दुबईत खेळाडूंचा लिलाव होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला मुंबईचा संघ गुजरातकडून घेऊ शकतो.