बेंगळुरूच्या लढाऊ बाण्याचे कोलकात्याच्या गंभीरकडून कौतुक!

कोलकात्याचा अवघ्या एका धावाने विजय

बेंगळुरूच्या लढाऊ बाण्याचे कोलकात्याच्या गंभीरकडून कौतुक!

विराट कोहलीसोबतचा जुना वाद संपुष्टात आणल्यानंतर कोलकात्याचे मेंटॉर गौतम गंभीर यांनी बेंगळुरूने दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. हा सामना बेंगळुरूने अवघ्या एका धावेने गमावला.रविवारी रंगलेल्या सामन्यात गौतम गंभीर याने बेंगळुरूसमोर टोपी काढून त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले. गंभीर आणि विराट हे दोघे एकमेकांशी चर्चा करत असल्याच्या छायाचित्रानेही अनेकांचे लक्ष वेधले.

बेंगळुरूच्या कर्ण शर्मा यने मिशेल स्टार्कच्या शेवटच्या षटकात तीन षटकार खेचून संघाला विजयाच्या समीप नेले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने ही संधी त्याला मिळवू दिली नाही आणि कोलकात्याचा अवघ्या एका संघाने विजय झाला. या विजयानंतर गंभीर यांनी ‘एक्स’वर बेंगळुरूने शेवटपर्यंत दिलेल्या लढ्याचे कौतुक केले.श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि फिल सॉल्ट याने १४ चेंडूंत तडकवलेल्या ४८ धावांच्या जोरावर रविवारी कोलकात्याने २० षटकांत २२२ धावा उभारल्या.

हे ही वाचा:

इराकमधून सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर पाच रॉकेट डागले!

न्यूज २४ चा माधवी लता यांच्याबाबत खोडसाळपणा, पोस्ट हटवली!

सांगलीतून विशाल पाटील लोकसभा अपक्ष लढणार?

न्यूझीलंडने तिसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून धुव्वा उडवला

बेंगळुरूला सुरुवातीलाच धक्का बसला तो विराट कोहलीच्या रूपात. तो विचित्र पद्धतीने बाद झाल्याने वाद झाला. त्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रसेलने दोघा खेळाडूंना त्या एकाच षटकात बाद केले. त्यानंतर नारायणने कॅमरून ग्रीन आणि महिपाल लोमरोर यांना पुढच्याच षटकात बाद केले. त्यानंतर रसेलने दिनेश कार्तिकची विकेट घेतली.

कोलकात्याकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे बेंगळुरू या गुणतक्त्यात आठ सामन्यांत अवघे दोन गुण मिळवून तळाला आहे. तर, कोलकात्याने हैदराबादला मागे टाकून या गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आता बेंगळुरूचा पुढचा सामना २५ एप्रिल रोजी हैदराबादविरोधात असून कोलकात्याचा पुढील सामना २६ एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध असेल.

Exit mobile version