आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) शुभारंभ आजपासून होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे. कोरोनामुळे यंदा आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी पार पडणार आहेत.

यंदाचा आयपीएल २०२२ हा १५ वा हंगाम मागील वर्षीपेक्षा अधिक भव्य आणि दीर्घकाळ चालणारा असेल. २०११ नंतर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२२ स्पर्धा भारतामध्येच कोरोना नियमांचे पालन करुन होणार आहे. सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील चार ठिकाणी होणार आहेत.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’

‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’

मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती वैशिष्टपुर्वक सेवा पदक

गेल्यावर्षी आयपीएलचे सामने भारतात झाले होते. मात्र, मे महिन्याच्या मध्यावर काही संघाच्या जैव-सुरक्षा परिघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे हंगाम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्यात आले. परंतु, यंदाही करोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने स्टेडिमयमध्ये केवळ २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वच खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.

Exit mobile version