आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लिगसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. शनिवार १२ फेब्रुवारी आणि रविवार १३ फेब्रुवारी असे दोन दिवस हा लिलाव चालणार आहे. बंगलोर येथे हा लिलाव पार पडणार असून आयपीएल स्पर्धेतील दहा संघ या लिलावात सहभागी होणार आहेत.

या लिलावात एकूण दहा संघ ६०० खेळाडूंसाठी बोली लावतील आणि त्यांना आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. सकाळी ११ वाजता या लिलावाला सुरुवात होणार असून स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आणि हॉटस्टारवर या लिलावाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. जगभरातील खेळाडूंना या लिलावाची उत्सुकता लागली असून प्रेक्षकांमध्येही उत्साह बघायला मिळत आहे. या मेगा लिलावात सर्वात जास्त बोली कोणत्या खेळाडूवर लागणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा नवाब मालिकांना दणका

डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?

‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’

सुरुवातीला या लिलावात ७ देशांचे ५९० क्रिकेटपटू सहभागी होणार होते. ज्यामध्ये २२८ कॅप्ड खेळाडू म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले खेळाडू असणार होते. तर ३५५ खेळाडू हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेले अनकॅप्ड खेळाडू होते. पण नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात भारतीय संघ विजयी झाल्यानंतर या संघातील १० खेळाडूंचा समावेश लिलावात करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण खेळाडूंचा आकडा हा ६०० वर गेला आहे.

या लिलावाच्या स्पर्धेतील आधीच दहा संघांनी मिळून ३३ खेळाडू हे रिटेन केलेले किंवा विकत घेतलेले आहेत. आयपीएलच्या या नव्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा आयपीएलचा हंगाम कसा होणार आणि संघ कसे तयार होणार हे या लिलावानंतर स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version