देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल २०२१ ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
IPL suspended for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI#COVID19 pic.twitter.com/K6VBK0W0WA
— ANI (@ANI) May 4, 2021
देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते. मात्र तरीही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कालचा आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना रद्द झाला होता.त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आयपीएलची स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
दरम्यान काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत.
हे ही वाचा:
लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा
मुंबईत ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाला सुरवात
यंदा राज्यात पाणी टंचाई नाही, वाचा सविस्तर…
एक जुलैपासून मुंबईतील शाळा सुरु होणार- शास्त्रज्ञ
याआधी गेल्या वर्षी २०२० मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे.