26 C
Mumbai
Tuesday, December 31, 2024
घरविशेषकोलकाता की चेन्नई? कोण करणार विजयी सिमोल्लंघन

कोलकाता की चेन्नई? कोण करणार विजयी सिमोल्लंघन

Google News Follow

Related

जगभरातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धांपैकी एक असणाऱ्या आयपीएल २०२१ चा कोण ठरणार याचा आज फैसला होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आयपीएल २०२१ च्या विजेते पदावर आपले नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी नेमका कोणता संघ सीमोल्लंघन करणार याकडे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलच्या १२ हंगामांमध्ये नऊ वेळा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर यापैकी ३ वेळा आयपीएलचा विजेता संघ ठरला आहे. तर २०१०, २०११ आणि २०१८ अशा तीन वर्षात चेन्नईचा संघ आयपीएलचा विजेता संघ ठरला आहे. तर आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाने दोन वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले आहे. २०१२ आणि २०१४ साली कोलकाताचा संघ विजेता ठरला होता.

हे ही वाचा:

‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!

उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?

घाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा

अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी

या वर्षीच्या आयपीएलच्या हंगामाता चेन्नईचा संघ खूपच नियमितपणे चांगला खेळताना दिसला आहे. गुणतालिकेत सुद्धा चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. तर कोलकात्याच्या संघ चौथ्या स्थानावर असून चांगल्या रन रेटचा त्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी आत्तापर्यंतच्या स्पर्धेतल्या सादरीकरणाच्या आधारे चेन्नईचा संघ मजबूत वाटत असला तरीही कोलकाता संघाला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे आजचा सामना रोमहर्षक होणार यात शंका नाही. आज संध्याकाळी ७.३० वाजता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर आयपीएलच्या अंतिम फेरीचे धुमशान पाहायला मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा