आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरवात

आयपीएलच्या चौदाव्या  हंगामाला आजपासून सुरवात

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचं बिगुल आजपासून म्हणजेच ९ एप्रिलला वाजणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार आहे.

५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईच्या नावावर एका खराब कामगिरीची नोंद आहे. मुंबई इंडियन्सने २०१३ पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल २०१३ च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. जसप्रीत बुमराहने याच सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. २०१३ पासून आतापर्यंत आयपीएलचे ७ हंगाम संपुष्टात आले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता ८ व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

अमेरिका- युरोपने कोविशिल्डचा कच्चा माल रोखला

काय डेंजर वारा सुटलाय

२०२० मधील आयपीएलचा हंगाम हा कोविडमुळे भारतात होऊ शकला नव्हता. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या या हंगामात स्टेडियममध्ये प्रेक्षक नव्हते. यावेळीही सामने भारतात जरी होणार असले तरी सामन्याच्यावेळी प्रेक्षक उपस्थित नसतील.

Exit mobile version