29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषआयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

आयफोन १३ लॉंच, काय आहेत नवीन फीचर्स?

Google News Follow

Related

अमेरीकन टेक कंपनी ऍपलचा कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग इव्हेंट सुरु आहे. या इव्हेंटदरम्यान आतापर्यंत कंपनीने आय-पॅड मिनी, वॉच सीरीज ७ सह आयफोन १३ सिरीज सादर केली आहे.

कंपनीनं आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये सांगितलं की, आयफोन १३ ला वेगवेगळ्या वर्जनमध्ये लॉन्च करण्यात येईल. ज्याचा डिस्प्ले ६.१ इंचाचा असेल आणि हा एक रेग्युलर मॉडल असेल. तसेच ५.४-इंच स्क्रिनसोबत आयफोन १३ मिनी मॉडल असेल. सध्या कंपनी आपल्या युजर्सना ओलेड पॅनल स्क्रिन देण्यात आली आहे. सध्या कंपनीने आपल्या नव्या स्मार्टफोनला जुन्या डिझाईनसह लॉन्च करण्यात आला आहे.

आयपॅड मिनीमध्ये टॉप बटन म्हणून टच आयडीसह ८.३ इंच स्क्रीन आहे. मागील पिढीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत ऍपल ४० टक्के वेगवान सीपीयू परफॉर्मन्स आणि जीपीयू कामगिरीमध्ये मोठी उडी घेण्याचे आश्वासन देत आहे. हे ए १३ बायोनिक चिपसेटवर देखील चालते. आय-पॅड मिनीमध्ये आता यूएसबी-सी पोर्ट आहे. आपण ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप तसेच इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. तसेच आयपॅड ५जी ला सपोर्ट करतो. आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे ज्यात ४ के मध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. त्याची प्रारंभिक किंमत $ ४९९ (३६,७४२ रुपये) सुरु होते.

हे ही वाचा:

दोन दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव अर्ध्यावर?

पाकिस्ताननेच आम्हाला अफगाणिस्तानमध्ये फसवले

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

आयफोन १३ च्या डिस्प्लेमध्ये १२०० निट्स ब्राइटनेस देण्यात आला आहे. एक्सडीआर डिस्प्ले यूजर्ससाठी ब्राइट, रिच एक्सपीरियंसबाबत म्हटलं आहे. ऍपल आयफोन १३ च्या कॅमेऱ्यात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये मिनी आणि रेग्युलर वर्जन दोघांसाठी लो लाइट परफॉर्मंसचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कॅमेऱ्यातही नवा सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे. जो सब्जेक्टची हालचाल झाल्यानंतरही फोकस करण्यासाठी मदत करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा