श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तव्यावर नाराजी व्यक्त करत म्हणाले की, सोहळ्यासाठी निमंत्रण फक्त राम भक्तांना देण्यात आली आहेत.याशिवाय संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत त्यांच्यावर भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोपही केला.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे.देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.सोहळ्याची तयारी देखील जोरदार सुरु आहे.पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामाचा अभिषेक करण्यात येणार आहे.सोहळ्यासाठी देशभरातील नामांकित लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.मात्र, या सोहळ्यासाठी काही विरोधी पक्ष प्रमुख नेत्यांना अजूनही निमंत्रण देण्यात आलेले नाही.त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.या भव्य सोहळ्यासाठी निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा तीळ पापड झाला आहे.यावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सत्ताधारी पक्षावर आरोप करत सुटले आहेत.
निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे म्हणाले होते की, या सोहळ्याचे राजकारण होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, सरकारने नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली ते आज नाहीत. त्यावेळी शाळेच्या सहलीसाठी अनेकजण तिथे गेले होते. हजारो कारसेवक लढले. त्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचे विशेष आभार. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनाही निमंत्रित केले नव्हते असे मी ऐकले आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
हे ही वाचा:
भारतासोबतचे संबंध बिघडत असताना, मालदीवचे राष्ट्रपती चीनला भेट देण्याची शक्यता!
अयोध्येत भव्य राम मंदिर ते लोकसभा निवडणुका…
बिहारमध्ये एका रात्रीत तलाव चोरीला
रामलल्लाच्या बालरूपासारख्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होणार
या विधानावरुन अयोध्या राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत म्हणाले की, या सोहळ्याची निमंत्रणे फक्त ‘राम भक्तांना’ पाठवण्यात आली आहेत.जे रामाचे भक्त आहेत त्यांनाच आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्ष भगवान रामाच्या नावाने लढत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या पंतप्रधानांना सर्वत्र आदर मिळत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बरीच कामे केली आहेत. हे राजकारण नाही. हे त्याचे समर्पण आहे.
संजय राऊतांवर देखील निशाण साधत पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, ‘संजय राऊत यांना इतके दुःख झाले आहे की ते व्यक्तही करू शकत नाहीत. त्यांनीच प्रभू रामाच्या नावाने निवडणूक लढवली होती. जे प्रभू राम मानतात, जे सत्तेत आहेत, ते कसले बकवास बोलत आहेत? ते प्रभू रामाचा अपमान करत आहेत,” असे श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.