अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशातील सर्वच कानाकोपऱ्यातून मंदिरासाठी भेटवस्तू पाठविण्यात येत आहेत. अशातच देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता म्हणून आमंत्रण देण्याचे कामही जोमाने सुरू आहे.
येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंना निमंत्रण पत्रे दिली जात आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनाही अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कोहलीशिवाय वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात हजारो प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत.
Virat Kohli and Anushka Sharma have been invited for Pran Pratishtha of Lord Rama at Ram temple in Ayodhya 🛕
📸: Pari/x pic.twitter.com/zipszeLR8C
— CricTracker (@Cricketracker) January 16, 2024
राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी आमंत्रित केलेला कोहली हा पाचवा क्रिकेटपटू आहे. वृत्तानुसार, निमंत्रण स्वीकारण्यासाठी कोहली भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर थेट मुंबईला गेला होता. दरम्यान, निमंत्रण मिळाल्यानंतर कोहली मंगळवारी बंगळुरूला रवाना झाला.
हे ही वाचा:
इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी
विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर
भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न
अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!
यापूर्वी आपल्या गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि गेली अनेक दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी आशा भोसले, उषा मंगेशकर यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे आशा भोसले आणि उषा मंगेशकर या २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यात सहभागी होणार आहेत.