अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण

राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे न्यायाधीश निमंत्रित

अयोध्येतील सोहळ्याचे ‘त्या’ पाच न्यायाधीशांना निमंत्रण

अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहे. देशभरात या सोहळ्याचा उत्साह असून सध्या जय्यत तयारी सुरू आहे. २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश- विदेशातल्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील अनेक दिग्गजांना या सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे या प्रकरणातील जे पाच न्यायाधीश होते त्या सगळ्यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण धाडण्यात आलं आहे.

राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डीवाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर अशा पाचही न्यायाधीशांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या पाच जणांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला.

राम मंदिर- बाबरी मशीद वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंतिम आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, “२.७७ एकरची वादग्रस्त जमीन रामलल्लाचे जन्मस्थान आहे. न्यायालयाने ही जमीन भारत सरकारने नंतर स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने सरकारला उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला स्वतंत्र पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते जेणेकरून बोर्ड मशीद बांधू शकेल. ६ डिसेंबर १९९२ रोजी एका जमावाने बाबरी ढाचा पडला. यानंतर राम मंदिर आंदोलनाने वेगळे वळण घेतलं होतं.”

हे ही वाचा:

मलाही माझ्या लहानपणी अशा घरात रहायला मिळालं हवं होतं, पंतप्रधान झाले भावूक!

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी काही राज्यांमध्ये सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. या कार्यक्रमासाठी देशातील खेळाडू, अभिनय क्षेत्रातील दिग्गज, व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

Exit mobile version