शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पत्र लिहून स्पष्ट केली भूमिका

शरद पवारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात राम लल्लाचा अभिषेक सोहळा होणार आहे. याची तयारी जोरदार सुरू असून देशभरात याचा उत्साह आहे. दरम्यान दुसरीकडे या सोहळ्याचे निमंत्रण देण्याचे कामही सुरू आहे. राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते आणि अनेक दिग्गजांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

शरद पवार यांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिले आहे. पत्र लिहून शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोहळ्याचे निमंत्रण दिल्याबद्दल आभार व्यक्त करत त्यांनी सांगितले आहे की, २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर मी मोकळेपणाने वेळ काढून दर्शनासाठी येईन आणि तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण होईल.

हे ही वाचा:

इस्रायलने मारले हमासचे ९ हजार दहशतवादी

विमानतळावरील व्हायरल व्हिडीओनंतर नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोने इंडिगोकडून मागविले उत्तर

भारतीय समाजाचा मानबिंदू नष्ट करण्याचे अथक प्रयत्न

अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!

शरद पवार पत्रात काय म्हणाले आहेत?

“२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या भक्तीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील सोहळ्याबाबत रामभक्तांमध्ये उत्सुकता असून ते मोठ्या संख्येने तेथे पोहोचत आहेत. या ऐतिहासिक घटनेचा आनंद त्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचले. २२ जानेवारी रोजी उत्सव पूर्ण झाल्यानंतर, श्री राम लल्लाचे दर्शन सहज आणि आरामात घेता येईल. मी अयोध्येला येण्याचा विचार करत आहे, त्यावेळी मी भक्तीभावाने श्री राम लालाजींचे दर्शन घेईन. तोपर्यंत राम मंदिराचे बांधकामही पूर्ण झाले असेल. तुम्ही दिलेल्या निमंत्रणाबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृपया माझ्या शुभेच्छा स्वीकारा.”

Exit mobile version