अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्यासाठी देशभरातील प्रतिष्ठित, नामांकित लोकांना निमंत्रण देण्यात येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अयोध्येत हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.सोहळ्याची तारीख जवळ आली असून तशी जोरदार तयारी अयोध्येत सुरु आहे.हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक उत्सुक आहेत.या सोहळ्याला देशभरातून तब्बल आठ हजार नामांकित, प्रतिष्ठित लोकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
मेहबुबा मुफ्तींच्या गाडीचा अपघात, थोडक्यात बचावल्या!
मुलाचा मृतदेह लपवून नेणारी सुचाना सेठ बेंगळुरूमधील वाहतूककोंडीमुळे अडकली
लालकृष्ण अडवाणी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
सीबीआयने नितीमत्ता समितीच्या अहवालाची प्रत मागवली
आतापर्यंत अनेकांना सोहळ्याचे निमंत्रण मिळाले असून अजूनही निमंत्रण देण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता अजित पवार यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.सोहळ्यासाठी अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रातील सात राजकीय नेत्यांना सोहळ्याचे निमंत्रण मिळले आहे.त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, रिपाई खासदार रामदास आठवले ,उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.