सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती

सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु!

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशीला सुरुवात झाली आहे. सज्जाद नोमानी यांनी युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं होतं. या व्हिडीओनंतर महायुतीने व्होट जिहादचा आरोप करत महाविकास आघाडीवर टीका केली. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नोमानी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, या प्रकरणी आता चौकशीला सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाकडे तक्रार करत त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. मुस्लिमांचा धार्मिक भावना भडकवणे, द्वेषयुक्त भाषण करणे, ज्या मुसलमानाने भाजपचे समर्थन केले त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे, वोट जिहाद आवाहन करणे अशा तक्रारी त्यांनी केल्या होत्या. या प्रकरणी आता नोमानी यांच्या चौकशीला सुरवात झाली आहे.

हे ही वाचा : 

पवार म्हणतात, ‘ब्राह्मण’ही वोट जिहाद करतात!

ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी दाखविली चमक

बुलडोझर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही गंभीर मुद्दे

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी कडक पावले उचलावीत

भाजपा नेते किरीट सोमय्या ट्वीटकरत म्हणाले, मौलाना खलीलूर रहमान सज्जाद नोमानी यांच्या विरोधात चौकशी सुरु झाली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी काल रात्री माझे बोलणे झाले. परभणीचे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी तपास सुरु केला आहे. आज रात्रीपर्यंत ते आपला अहवाल मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवणार आहेत, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

 

Exit mobile version