23 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरविशेष'व्होट जिहाद'ची चौकशी करा अन भाजपच्या पराभवासाठी मशिदीतून निघालेले फतवे जगासमोर आणा!

‘व्होट जिहाद’ची चौकशी करा अन भाजपच्या पराभवासाठी मशिदीतून निघालेले फतवे जगासमोर आणा!

भाजप नेते आमदार अतुल भातखळकरांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीची तयार सुरु झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. याच दरम्यान, ‘व्होट जिहाद’ संज्ञेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे, ज्यामुळे लोकसभेत मविआ आणि इंडी आघाडीला फायदा झाल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर व्होट जिहाद नावाची संकल्पना समोर आली होती. व्होट जिहाद नुसार, मुस्लीम मतदारांचा एक गठ्ठा एखाद्या पक्षाला मतदान करतो.

यावरून महायुतीच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेत विरोधकांवर टीका केली आणि इंडी आघाडीला याचा फायदा झाल्याचा आरोप केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबबत ट्वीटकरत अनेक मतदार संघातील आकडेवारीची यादी देखील पोस्ट केली होती. यावरून आता निवडणूक आयोगाने तपास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयावर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत, चौकशी करून जगासमोर सत्य आणण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी (१६ ऑक्टोबर) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी ‘व्होट जिहाद’ शब्दाचा वापर भाषणातून केला जात असल्याचे म्हटले. यावर आयोगाचे अधिकारी म्हणाले, आपल्याकडे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. कोणी आपली मते मांडणे, वैयक्तिक किंवा जाहीरपणे या सगळ्याबद्दल आपल्या कायद्यात काही ना काही म्हटलेले आहे. कायद्याच्या बाहेर जाणार कोणी विधान करत असेल तर कारवाई नक्की केली जाईल.

हे ही वाचा : 

झाकीर नाईकच्या व्हिडीओंनी प्रभावित होऊन सलमानने मुथ्यालम्मा मंदिरात केली तोडफोड

झाकीर नाईक भारतातून पळालेला नमुना…पाकिस्तानी पत्रकाराने काढली लायकी

नऊ बलुच विद्यार्थ्यांचे पाक अधिकाऱ्यांनी केले अपहरण

बाबा सिद्दीकींवर झाडलेल्या गोळ्या टर्किशमेड पिस्तूलातील!

आपण जो प्रश्न विचारत आहात की, (व्होट जिहाद) हे विधान कायद्याच्या बाहेर जाणार आहे किंवा नाही. याचे उत्तर नक्की काय झालेले आहे?, पुरावे काय आहेत?, याच्यावर अवलंबून आहे. आणि कायद्याच्या चौकटीतच हे सिद्ध व्हावे लागते. व्होट जिहाद बद्दल आपण जी सूचना मांडलेली आहे, या बाबत तपास करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यानी म्हटले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत ‘व्होट जिहाद’बाबत तपासणी करून जगासमोर सत्य आणण्याची मागणी केली आहे.

अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले की, निवडणूक आयोगाने व्होट जिहादची जरूर चौकशी करावी आणि २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मशिदीतून भाजपला हरवण्यासाठी फतवे निघाले होते, हे सत्य जगासमोर आणावे. धार्मिक स्थळांचा वापर राजकीय कारणांसाठी होऊ शकतो का? हे ही या चौकशीमुळे हिंदू समाजाला स्पष्ट होईल. लव्ह जिहाद या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केरळ उच्च न्यायालयाने केला होता याची आम्ही आठवण करून देऊ इच्छितो, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा