समाजकंटकांनी सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून कोल्हापुरात दोन गटात मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर प्रशासनाने शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. येत्या १६ जून पर्यंत कोल्हापुरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कोल्हापुरातील स्थिती नियंत्रणात आली असून व्यवहार सुरळीत पूर्वपदावर येत आहे. शहरातील अनेक भागांमधील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता ४८ तासांनंतर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापुरात हिंसाचार झाल्याच्या घटनानंतर पोलिसांनी शहरातील इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यानंतर अनेक बँका तसेच शासकीय कार्यालयांतील व्यवहार खोळंबले होते. त्यानंतर आता इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्यानंतर कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मंगळवार आणि बुधवारी शहरातील अनेक ठिकाणी संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड करत दुकानांवर दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत अनेक ठिकाणी बंदोबस्त वाढवला होता. कोल्हापूर पालिकेचा भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला आणि शिवाजी रोड परिसरात दोन गटात तुफान राडा झाला होता.
हे ही वाचा:
धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना
लव्ह जिहादमुळे राष्ट्रीय बेसबॉलपटूची आत्महत्या, हिंदू असल्याचे दाखवत मुलाने फसवले
चीनी कंपनी शाओमी टेक्नोलॉजीला ईडीचा दणका
ओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; अपघात की घातपात?
कोल्हापुरात हिंसाचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली होती. बाहेरून येणाऱ्या भाविक कोल्हापुरात येण्यासाठी फेरविचार करत होते. शहरातील स्थिती नियंत्रणात आल्यानंतर आता शहरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शुक्रवारी तब्बल १० हजार भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर आता इंटरनेट सुविधा सुरळीत करण्यात आल्यानंतर शहरातील व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.