अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. अमरावतीतील दंगलींना आठवडा लोटल्यानंतर आता ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तरी देखील अमरावती जिल्ह्यातील संचारबंदी अद्याप हटवण्यात आलेली नाही.

त्रिपुरा येथे मशीद पाडल्याची अफवा पसरल्यामुळे महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव या भागात निषेध मोर्चाच्या नावाखाली मुसलमान समाज रस्त्यावर उतरला. यावेळी हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून अमरावती बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये देखील जमाव आक्रमक झालेला पाहायला मिळाला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पण आता ही इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी या संदर्भातील निर्णय स्थानिक पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पण असे असले तरी देखील अमरावतीमध्ये संचारबंदी अर्थात कलम १४४ अद्यापही लागू आहे.

तब्बल सहा दिवसांनंतर अमरावतीतील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून अफवा पसरून शहरातील शांतता बिघडू नये आणि वातावरण गढूळ होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.

हे ही वाचा:

न्यूझीलंड सोबत आज दुसरा टी२० सामना! भारताला मालिका विजयाची संधी

बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्य जनता यांचे हाल झालेेले पाहायला मिळाले. कोरोनाची स्थिती संपूर्णतः संपलोमी नसल्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सुरू आहे. तर अनेक ठिकाणी नोकरदार वर्ग इंटरनेटच्या माध्यमातून वर फ्रॉम होम करताना दिसत आहे. या सर्वच गोष्टींवर जिल्ह्यातील इंटरनेट बंदीमुळे परिणाम झाला होता. पण अखेर सहा दिवसांनंतर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Exit mobile version