जम्मू काश्मीर दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज सर्वांसोबत योगा केला. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी येथील लोकांना संबोधित केले आणि नंतर सर्वांसोबत योगासने केली.
पाऊस पडत असल्याकारणाने शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्येचा योगासने करण्याचा कार्यक्रम पार पडला. योग संपवून पंतप्रधान मोदी बाहेर आले आणि दल सरोवराच्या काठावर योगा करणाऱ्या लोकांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला. शेवटी पंतप्रधान मोदींनी योगाचे फायदे सांगून येथे येणाऱ्या लोकांना संबोधित केले.
हे ही वाचा..
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा!
‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’
राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!
अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी!
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, आज जगभरात योग करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि योगाकडे लोकांचे आकर्षणही सातत्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि ध्यानाची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरच्या भूमीतून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणाऱ्यांचे अभिनंदन करतो, ते पूढे म्हणाले.
सेंटरमधून लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले मन शांत असले की आपण आपला जगावर प्रभाव टाकू शकतो. योगामुळे समाजात सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग निर्माण होत आहेत. ते पुढे म्हणाले, भारताने २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता आणि भारताच्या या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता. हा एक एक विक्रम होता. तेव्हापासून योग दिन सातत्याने नवनवीन विक्रम निर्माण करत आहे.
स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी योग हा जीवनाचा एक भाग आहे. जर तुम्ही योगाचा तुमच्या जीवनात समावेश केला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असा माझा विश्वास आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.